ब्रेकिंग! हिवाळी अधिवेशनापूर्वी एकरकमी एफआरपी न दिल्यास कठोर कारवाई होणार ; सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती

Sugarcane FRP : येत्या काही दिवसात राज्यात उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या हिवाळी अधिवेशनापूर्वीच आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषिमंत्री अब्दुल सत्तार सहकार मंत्री अतुल सावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तसेच इतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे.

या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीवर सखोल चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न अर्थातच एकरकमी एफआरपी बाबत मोठा निर्णय झाला असून कारखान्यांना एकरकमी एफआरपी वर्ग करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे.

Advertisement

मात्र शासन दरबारी निर्णय झाला असला तरी साखर कारखान्यांकडून अजूनही एकरकमी एफ आर पी शेतकऱ्यांना वर्ग केली जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी यावर अतुल सावे यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. अतुल सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकरकमी एफ आर पी वर्ग केली पाहिजे.

असा निर्णय शासन दरबारी झाला आहे. यामुळे जे साखर कारखानदार संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यासंबंधीचे निर्देश जारी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. निश्चितच काळी अधिवेशनापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा पैसा मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत.

दरम्यान सहकार मंत्री अतुल सावे यांनी ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊसतोड कामगार यांच्यासाठी स्थापन केलेल्या ऊसतोड महामंडळातील सदस्यांच्या लवकरच नियुक्त्या होतील असं देखील नमूद केले आहे. एकंदरीत आता शासनाच्या या निर्देशानंतर ऊस उत्पादक बागायतदारांना वेळेवर एकरकमी एफ आर पी मिळतंय का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Advertisement