पिकांना खत द्यायचे तर आता नाही मजुरांचे टेन्शन! या शेतकऱ्याने बनवले घरच्या घरी अनोखे खत पेरणी यंत्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारचे व्यवस्थापन करतात. यामध्ये पिकांच्या लागवडी अगोदर पूर्व मशागत, त्यानंतर लागवडीसाठी शेत तयार करणे, प्रत्यक्षात पिकांची लागवड त्यानंतर अंतर मशागत व शेवटी पिकांची काढणी इत्यादी टप्प्यांमध्ये शेतकरी योग्य व्यवस्थापन करत असतात. परंतु आता शेतकरी या सगळ्या व्यवस्थापनाच्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर करतात.

कारण यंत्रांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. तसेच वेळेच्या वेळी  व्यवस्थापनाच्या सगळ्या बाबी पूर्ण झाल्यामुळे पीक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून देखील ते फायद्याचे ठरते. तसेच कुठल्याही कामाकरिता मजूर म्हटले म्हणजे मजूर टंचाईची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि मजुरीचे दर देखील भरमसाठ वाढल्याने शेतकऱ्यांचा यामुळे उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे यंत्रांचा वापर हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो.

परंतु अशी यंत्रे बऱ्याचदा महाग असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी टाकाऊ वस्तूंपासून अनेक जुगाड करून यंत्र बनवतात व या यंत्रांचा वापर शेतीतील विविध कामांकरिता केला जातो. अगदी शेतीमधील पिकांना खत द्यायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर मजूर लागते. परंतु हेच खत देण्याचे काम जर यंत्राच्या माध्यमातून केले गेले तर नक्कीच मजुरी वरील  खर्चात बचत होते. याच पद्धतीने एका शेतकऱ्याने खत पेरणी करता उपयोगी पडेल असे घरगुती टाकाऊ वस्तु पासून जुगाड केला व खत पेरणी यंत्र बनवले असून या यंत्राची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 शेतकऱ्यांनी जुगाड करून बनवले खतपेरणी यंत्र

एका शेतकऱ्याने अगदी घरच्या जुन्या वस्तूंपासून हे जुगाड यंत्र बनवले असून यामध्ये प्रामुख्याने घरातील जार बॉटल, लहान मुलांची जी काही सायकल असते तिचे चाक आणि काही लोखंडी वस्तूंचा यामध्ये वापर केला गेला आहे. तसेच यामध्ये एका पाईपचा देखील वापर केला गेला आहे.

खत पिकाला देताना त्याचे प्रमाण कमी जास्त करता यावे व खत व्यवस्थित  शेतामध्ये पडावे याकरिता देखील या शेतकऱ्यांनी या यंत्राला एक कॉक देखील बसवला आहे. या कॉकच्या साह्याने शेतकरी खताचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. जर आपण हे यंत्र बनवण्याची किंमत पाहिली तर शेतकऱ्याने याबद्दल जी माहिती दिली ती आश्चर्यचकित करणारी आहे. शेतकऱ्याच्या मते हे यंत्र बनवण्यासाठी 1200 रुपये इतका खर्च आला.

या यंत्राचे प्रमुख वैशिष्ट्ये

हे जुगाड यंत्र कोणताही शेतकरी त्याच्या घरच्या घरी बनवू शकतो. यासाठी लागणारा खर्च अत्यल्प असून  या जुगाडा मुळे शेतात खत पेरणे अगदी सोपे होते.मजुरांचे जास्त आवश्यकता भासत नाही. एक व्यक्ती देखील आरामात या जुगाड यंत्राच्या  साह्याने खत देऊ शकतो. तसेच हे यंत्र वजनाने खूपच हलके असून त्याला आपण कुठेही  घेऊन जाऊ शकतो.