‘या’ युवा शेतकऱ्याने सुरू केले अद्रक वॉशिंग सेंटर आणि स्वतःसह दिला 400 ते 450 लोकांना रोजगार! वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

Ajay Patil
Published:
farmer success story

सध्या नोकऱ्या नसल्यामुळे नोकऱ्यांच्या मागे न लागता काहीतरी छोटा मोठा व्यवसाय उभारून जीवनाची वाटचाल यशस्वीतेकडे करणे ही काळाची गरज आहे. तसेच व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत घेऊन व्यवसाय उभारणी करता येणे आता शक्य झाले आहे.

व्यवसाय करण्यासाठी व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे असते व यामध्ये शेतीशी संबंधित असलेल्या अनेक छोटे-मोठे व्यवसायांची यादी तयार होते व यामधून एखाद्या चांगला व्यवसायाची निवड करून त्यामध्ये स्थिर स्थावर होणे गरजेचे आहे.

शेतीशी निगडित अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत व अशाच एका व्यवसायाच्या माध्यमातून विदर्भातील देऊळगाव राजा या तालुक्यातील चिंचखेडा या गावच्या एका युवा शेतकऱ्याने  अद्रक पिकाशी संबंधित असलेल्या एका व्यवसायाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने रोजगार निर्माण केला व त्यासोबत इतर लोकांना देखील रोजगार मिळवून दिला आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 अद्रक वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून आर्थिक भरारी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विदर्भातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या चिंचखेडा या गावचे युवा शेतकरी सतीश वायाळ यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता अद्रक या पिकाच्या संबंधित असलेल्या व्यवसायाची निवड केली व या माध्यमातून मागील वर्षापासून त्यांनी टेंभुर्णी येथे टेंभुर्णी जाफराबाद रोडवरील गोधनखेडा शिवारात स्व:मालकीचे अद्रक वाशिंग सेंटर सुरू केले आहे.

या त्याच्या वॉशिंग सेंटरवर दररोज 40 ते 50 टन अद्रकची आवक होते. या व्यवसायाकरिता सतीश वायाळ यांनी मध्यप्रदेश राज्यातून अद्रक काढणारे खास मजूर उपलब्ध करून दिले आहेत व सध्या या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी जवळपास चारशे ते साडेचारशे मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांकडून अद्रकची खरेदी जागेवरच केली जाते व ते आद्रक धुण्यापासून त्याची ट्रान्सपोर्टिंग आणि विक्रीची सर्व जबाबदारी सतीश वायाळ स्वतः सांभाळत असतात. या माध्यमातून ते लाखो रुपये मिळवत आहेतच व इतरांचा देखील पोटापाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होताना दिसून येत आहे कारण अद्रक साठी शेतकऱ्यांना ज्या काही सर्व सोयी सुविधा लागतात त्या या माध्यमातून मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल देखील आता अद्रक पिकाकडे वाढल्याचे दिसून येत आहे. जर आपण साधारणपणे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सोनखेडा, देऊळगाव उगले,

सोनगिरी, काळेगाव, बुटखेडा, खामखेडा इत्यादी गावांचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी अद्रकचे उत्पादन घेतात. सतीश वायाळ यांनी उभारलेल्या अद्रक सेंटरवर जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर परिसरातील  बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून देखील अद्रक उपलब्ध होते.

अशा पद्धतीने जर आपण पाहिले तर नोकरीच्या मागे न लागता आजकालच्या तरुणांनी छोट्या-मोठ्या उद्योगात रोजगाराच्या संधीचा शोध घेणे गरजेचे आहे व त्या माध्यमातून प्रयत्न करून स्वतःसह इतरांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe