महाराष्ट्रातील हा शेतकरी शेळीपालनातून वार्षिक कमवतो 1 कोटी रुपये! वाचा त्यांच्या शेळीपालनाची वैशिष्ट्ये आणि माहिती

Ajay Patil
Published:
success story

शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा देणारा व्यवसाय असल्यामुळे आता अनेक शेतकरी बंधू आणि नवतरुण व्यवसाय कडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. शेळीपालनामध्ये देशी शेळीसोबत अनेक प्रकारच्या संकरित जसे की बीटल, आफ्रिकन बोअर, उस्मानाबादी इत्यादी शेळ्यांचे पालन व्यवसाय दृष्टिकोनातून केले जात आहे. शेळीपालनात मोठ मोठे गोट फार्म सध्या उभारले जात असून आधुनिक पद्धत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेळीपालन व्यवसाय की फायदेशीर करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे प्रयत्न आहेत.

असेच शेळीपालनाच्या अनुषंगाने  आपण जर सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे उदाहरण घेतल्या तर या शेतकऱ्याने शेळीपालनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळवले असून आधुनिक पद्धतीने शेळी पालन व्यवसाय करत आहे व वार्षिक नफा एक कोटीच्या आसपास आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 शेळीपालनातून हा शेतकरी कमवत आहे वार्षिक एक कोटी रुपये निव्वळ नफा

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,तेजस लेंगरे हे हे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या बामणी या गावचे रहिवासी असून 2006 पासून त्यांनी शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली. त्यांच्याकडे अगोदर 2006 मध्ये सहा ते सात उस्मानाबादी जातीच्या शेळ्या होत्या. यामध्ये त्यांनी आफ्रिकन बोअर जातीची एक शेळी आणि आफ्रिकन बोअर जातीचा सेक नर बोकड येऊन त्यांनी शेळी पालन व्यवसायाला सुरुवात केली.

त्यानंतर हळूहळू शेळी व्यवसायात यश मिळवत त्यांनी 2013 मध्ये तब्बल 23 लाख खर्च करून शेळ्यांसाठी अत्याधुनिक असे शेडची उभारणी केली. त्यांच्या शेळीवर एक आफ्रिकन जातीचा नर बोकड असून त्याची किंमत दहा ते बारा लाख रुपये इतकी आहे. शेळ्यांना भरवण्याकरिता याच नराचा वापर प्रामुख्याने केला जातो. शेडची उभारणी करताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कंपार्टमेंट तयार केले असून त्यामध्ये वर्गवारीनुसार शेळ्या ठेवल्या जातात म्हणजेच टॅगिंग केलेल्या शेळ्या वेगळ्या अशा पद्धतीने कंपार्टमेंटची सोय केलेली आहे.

कंपार्टमेंटची रचना करताना काही कंपार्टमेंट उंचावर आहेत तर काही कंपार्टमेंटला अर्ध्यावर फळ्या ठोकून शेळ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. फळ्या लावून शेळ्यांची व्यवस्था करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे या फळ्यांवर ज्या शेळ्या राहतात त्यांचे मूत्र आणि लेंड्या या फळ्याच्या मध्ये असलेल्या गॅप ने खाली पडतात व त्यामुळे वरच्या फळ्यांवर घाण न होता शेळ्या स्वच्छ अशा वातावरणात राहतात.

तसेच याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे एका ठिकाणीच जर लेंढ्या किंवा मूत्र साचले तर अमोनिया वायू तयार होण्याची भीती असते व त्यामुळे शेळ्यांना विविध प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे या फळांची व्यवस्था करण्यात आली आहे. यांचा दैनंदिन जर आपण रुटीन पाहिला तर सकाळी सात वाजेपर्यंत त्यांचा संपूर्ण शेड झाडून वगैरे स्वच्छ केला जातो व साधारणपणे दहा वाजेपर्यंत शेळ्यांना  चाऱ्याचा पुरवठा केला जातो.

 असे केले आहे चाऱ्याचे व्यवस्थापन

यांसाठी चाऱ्याचे व्यवस्थापन करताना प्रामुख्याने त्यांच्याकडे मेथी गवत, दशरथ घास, तुती आणि हादगा गवताचा वापर ते चाऱ्यासाठी करतात. जे कंपार्टमेंट बनवलेले आहे ते कंपार्टमेंटच्या बाहेर चारा टाकण्यासाठी गव्हाणी तयार केलेले आहेत. गव्हाणी तयार करताना कंपार्टमेंटचे अँगल आणि गव्हाणीची उंची यामध्ये साडेआठ इंचाचा गॅप ठेवला गेला आहे व त्यामुळे शेळ्याना त्यांची मान आरामात या अँगलच्या मधून टाकून गव्हाणीतील चारा खाता येतो.

तसेच पिलांना चारा खाता यावा याकरिता मेथी घास किंवा दशरथ घासाचे जुडे तयार केल्या जातात व त्या एका दोरीच्या साह्याने कंपार्टमेंट अँगल ला थोड्या उंचीवर जेणेकरून त्या ठिकाणी पिल्लांचे तोंड व्यवस्थित जाईल अशा पद्धतीने बांधून जाते व आरामात पिल्लांना देखील चारा खाता येतो.तसेच पाणी व्यवस्थापन जर बघितले तर त्याची व्यवस्था खूपचउत्तम अशी असून प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये फायबर टब म्हणजेच पाटी सारख्या फायबर टबची व्यवस्था केली आहे व त्याला वरती पाईपला कॉक बसवला आहे. वरचा कॉल चालू केला की बकेटमध्ये पाणी पडते व शेळ्यांना ते आरामात गार पाणी पिता येते.

या बकेट दररोज साफ केल्या जातात त्यामुळे स्वच्छ पाणी शेळ्यांना उपलब्ध होते. तसेच स्वच्छ पाणी देता यावे याकरिता मेडिक्लोर नावाचे औषध देखील पाण्यात मिसळून ते पाणी शेळ्याना दिले जाते. तसेच त्यांच्या गोट फार्मवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाऱ्याची निर्मिती करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. उसासारख्या दिसणाऱ्या बुलेट फोर जी चाऱ्याच्या लागवडीसाठी देखील त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे.

तसेच व्ही 1जातीची तूतिची रोपे देखील तयार केली जात असून या तुतीच्या देखील चाऱ्यासाठी वापर करण्यात येत आहे. तसेच वंडर ग्रेस जातीचा सुबाभूळची रोपे देखील या शेड वर तयार करण्यात येत असून फुटवे चांगले येणाऱ्या व शेंगांचे प्रमाण कमी असणारा वंडरग्रास नावाचा सुबाभूळची देखील त्यांच्या फार्मवर तयार करण्यात आलेले आहेत.तसेच अंजनाचे रोपे देखील तयार करण्यात येत असून ओला आणि सुखाचारा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून अंजनाचे महत्त्व खूप आहे. महत्वाचे म्हणजे या चाराचे रोपे इतर शेतकऱ्यांना देखील बाहेर पाठवले जातात.

 लेंडी पासून बनवतात गांडूळ खत

या शेळीपालनातून जे काही लेंड्या मिळतात त्या माध्यमातून त्यांनी गांडूळ खत प्रकल्प देखील सुरू केला आहे. या प्रकल्पातून तयार होणारे गांडूळ खत इतर शेतकऱ्यांना विकले जाते आणि स्वतःच्या शेतीकरीता देखील मोठ्या प्रमाणावर ते वापर करतात. सतरा अठरा वर्षापासून ते गांडूळ खत आणि शेळीपालनात व्यवसायात असून खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहेत.याबद्दल बोलताना तेजस लंगरे म्हणतात की शेळीपालन व्यवसायाने मला कधीच तोटा दिलेला नाही.

व्यवसायावर व्यवस्थित लक्ष केंद्रित आणि या व्यवसायाविषयी असलेले प्रेम या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न त्यामुळेच मी यशस्वी झालो आहे असे ते आवर्जून सांगतात.तसेच शेळीपालन व्यवसायात नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते म्हणतात की योग्य प्रशिक्षण घेऊन शेळी पालन व्यवसायात येणे महत्त्वाचे आहे. दहा ते वीस शेळ्या घेऊन या व्यवसायाला सुरुवात करावी व हळूहळू या व्यवसायात वाढ करणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

तसेच आफ्रिकन बोअर जातीची शेळीपालन आर्थिक दृष्ट्या खूप फायद्याचे असल्याचे त्यांनी म्हटले. शेळी कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत चांगले उत्पादन देते म्हणून ते 2006 पासून आफ्रिकन बोर जातीची शेळी पालन करत आहेत. अशा प्रकारचे परफेक्ट नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ते या व्यवसायातून खर्च वजा जाता निव्वळ नफा 1 कोटी रुपये वर्षाला कमावत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe