Farmer Success Story: सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी शेतकऱ्याने फुलवली सफरचंदाची बाग! यूट्यूबच्या माध्यमातून शिकले व्यवस्थापन

Ajay Patil
Published:
apple crop

Farmer Success Story:- सध्या शेतकरी हे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक अशक्य बाबी शेतीमध्ये शक्य करताना आपल्याला दिसून येत आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आता तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला असून परंपरागत शेती पिके आणि पद्धत आता काळाच्या ओघात मागे पडले असून  आधुनिक पद्धतीची शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या साहाय्याने शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.

तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके व फळ पिकांचा प्रयोग देखील शेतकरी करत असून तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामान बदलावर मात करत अशा पिकांपासून भरपूर उत्पादन देखील मिळवत आहेत. या सगळ्या मुद्द्याला धरून जर आपण सफरचंद या फळ पिकाचा विचार केला तर सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर येते ते जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश हे राज्य होय.

कारण सफरचंद हे पीक प्रामुख्याने थंड वातावरणामध्ये चांगले उत्पादन देते व अशा प्रकारच्या थंड वातावरणच या पिकाला पोषक असते. परंतु आता महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रासारख्या उष्ण प्रदेशात देखील सफरचंदाचे पीक यशस्वी केल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेल. अगदी याच पद्धतीने सातपुडा परिसरात म्हणजेच नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्या ठिकाणच्या उष्ण वातावरणात देखील सफरचंदाची बाग यशस्वी केली आहे.

 आट्या पावरा या आदिवासी शेतकऱ्याने youtube वर बघून केली सफरचंदाची लागवड यशस्वी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातपुड्याच्या परिसरात असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील बिजरी या गावात राहणाऱ्या आट्या पावरा या आदिवासी शेतकऱ्यांनी युट्युबची मदत घेत नंदुरबार सारख्या उष्ण प्रदेशात सफरचंदाची बाग यशस्वी केलेली आहे. त्यांना youtube च्या माध्यमातून थंड प्रदेशात पिकल्या जाणाऱ्या सफरचंदा बद्दल माहिती मिळाली व युट्युब वर बघून त्यांनी सफरचंदाची शेती कशा पद्धतीने केली जाते बाबतची संपूर्ण माहिती घेतली.

ही माहिती घेतल्यानंतर त्यांनी सफरचंदाची लागवड करण्याचे निश्चित केले व ऑनलाइनच्या माध्यमातून राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यात असणाऱ्या जय हिंद नर्सरी मधून सफरचंद या फळ पिकाचे तीन जातींची रोपे मागवली आणि प्रयोग म्हणून या रोपांची लागवड केली. त्यामध्ये त्यांनी 60 रुपये पासून ते 340 रुपयापर्यंतची विविध प्रकारची सफरचंदाची  रोपे ऑनलाईन पद्धतीने मागवली व त्यांची लागवड केली.

या लागवड केलेल्या सफरचंदाच्या रोपांना कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक किंवा रासायनिक खतांचा वापर न करता फक्त नैसर्गिक पद्धतीने गाईचे शेण आणि गुळ यासोबतच बेसन पीठ चा वापर करून खत तयार केले व त्याचा वापर या सफरचंदाच्या झाडांसाठी केला व या प्रकारचे खत देण्याची आयडिया देखील त्यांना युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली.

सध्या शेतात लावलेल्या या सफरचंदाच्या झाडांना बारा महिन्यानंतर फळे आली असून त्यांनी केलेल्या या सफरचंदाच्या शेतीचे आता जिल्हाभरात चांगली चर्चा रंगली आहे.

आट्या पावरा यांनी ही सफरचंदाची लागवड प्राथमिक स्वरूपात प्रयोग म्हणून करून पाहिली व आता हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ते मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या शेतात सफरचंदाची लागवड करणार असून येणाऱ्या कालावधीत या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आट्या पावरा यांचा हा अनोखा प्रयोग त्या ठिकाणच्या आदिवासींसाठी एक प्रेरणा देणारा ठरेल हे मात्र निश्चित.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe