Tomato Cultivation: पावसाळ्यात कराल टोमॅटोच्या ‘या’ वाणांची लागवड तर मिळेल भरघोस उत्पादन आणि खिशात येईल पैसा! वाचा वैशिष्ट्ये

Ajay Patil
Published:
tomato variety

Tomato Cultivation:- भाजीपाला पिकांची लागवड कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेत चांगला पैसा शेतकऱ्यांना देऊन जाते.महाराष्ट्रातील शेतकरी प्रामुख्याने भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, मिरची, वांगे, आणि इतर वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करतात.

बऱ्याच भागांमध्ये टोमॅटो हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मागच्या वर्षी आपण बघितले की, कधी नव्हे इतके उच्चांकी दर मिळाले. यामुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झालेच परंतु काही शेतकरी  कोट्याधीश झाल्याच्या बातम्या देखील आपण ऐकल्या. त्यामुळे यावर्षी देखील शेतकऱ्यांनी कमीत कमी पाण्यामध्ये नियोजन करून टोमॅटो लागवडीकडे मोर्चा वळवल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

तसेच आता खरीप हंगामाची सुरुवात काही दिवसांनी होणार असून पावसाळ्याच्या कालावधीमध्ये देखील बरेच शेतकरी टोमॅटोची लागवड करतील. त्यामुळे टोमॅटोचे भरघोस उत्पादन हवे असेल तर दर्जेदार वाण लागवडीसाठी निवडणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण टोमॅटोच्या काही दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जातींची माहिती घेणार आहोत व या जाती पावसाळी हंगामामध्ये लागवडी करिता उपयुक्त आहेत.

 पावसाळी हंगामात टोमॅटोच्या या जाती लागवडीसाठी ठरतील फायद्याच्या

1- पुसा गौरव टोमॅटोचा हा एक सुधारित वाण असून भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक पट्ट्यामध्ये याची लागवड केली जाते. टोमॅटोच्या या वाणापासून हेक्टरी 400 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे पावसाळी हंगामात टोमॅटो लागवडीसाठी ही जात फायद्याची ठरेल.

2- अर्का गौरव अर्का गौरव हे टोमॅटोची जात भरघोस उत्पादनासाठी फायद्याची असून या जातीच्या टोमॅटोचा रंग हा गडद लाल असतो. याबाबत कृषी तज्ञ म्हणतात की टोमॅटोच्या या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी साडेतीनशे क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

3- पुसा रूबी हा एक टोमॅटोचा सुधारित वाण असून पावसाळी हंगामात लागवडीसाठी फायद्याचा आहे. याबाबत कृषी तज्ञ म्हणतात की, या वाणाची लागवड तीनही हंगामामध्ये करता येणे शक्य आहे. याची काढणी लागवडीनंतर साधारणपणे 90 दिवस म्हणजेच तीन महिन्यात करता येते. टोमॅटोच्या या वाणापासून हेक्टरी 325 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळत असल्याचा देखील दावा केला जातो.

4- पुसा शितल पुसा शितल हा देखील टोमॅटोचा एक चांगला वाण असून भारतातील अनेक राज्यांमध्ये या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व हेक्टरी साडेतीनशे क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या वाणात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe