Tractor News: आयशरचा हा नवीन ट्रॅक्टर लॉन्च! शेतकऱ्यांची इंधनामध्ये होईल मोठी बचत, वाचा संपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor News:  कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर हे होय. पिकांची पूर्वमशागत असो की तयार माल बाजारपेठेपर्यंत किंवा घरापर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. तसेच अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी देखील शेतकरी बंधू ट्रॅक्टरचा वापर करतात. बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर मॉडेल्स उपलब्ध असून प्रत्येकाची वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. परंतु जर आपण या सगळ्या ट्रॅक्टर ब्रँडचा विचार केला तर यामध्ये आयशर हा एक लोकप्रिय भारतातील ट्रॅक्टर ब्रँड आहे.

या आयशर ब्रँडची सर्वाधिक विक्री होणारी ट्रॅक्टर सिरीज म्हणजेच प्रायमा ही होय. या सिरीज मध्ये तुम्हाला 40 ते 50 एचपी पर्यंतचे चार प्रकारचे ट्रॅक्टर कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये दोन व्हील आणि चार व्हील ड्राईव्ह अशा प्रकारची वैशिष्ट्ये येतात. या सिरीज मधील ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य म्हणजे कमी इंधनांच्या वापरामध्ये उत्तम कामगिरी हे सांगता येईल. सध्या या प्रायमा मालिकेमध्ये आयशर कंपनीने सर्वात स्वस्त ट्रॅक्टर 40 एचपी इंजिन आणि चार व्हील ड्राईव्ह पर्यायासोबत लॉन्च केले असून त्याचे नाव आहे आयशर 380 4WD प्रायमा G3 होय.

 आयशरच्या या नवीन ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

1- आयशरचा 380 4WD प्रायमा G3 हा नवीन लॉन्च केलेला ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने खूप कमी किमतीमध्ये अनेक प्रकारची वैशिष्ट्ये दिली आहेत. हा कमी अश्वशक्तीचा ट्रॅक्टर असल्यामुळे याला डिझेल देखील कमी लागते व त्यामुळे शेतकऱ्यांची बचत होते.

2- हे ट्रॅक्टर तीन सिलेंडरसह 2500 सीसी वॉटर कुल्ड इंजिनच्या माध्यमातून समर्थित आहे. 40 एचपी क्षमतेचे हे ट्रॅक्टर असून यातील मल्टी डिस्क ऑइल इमस्ड ब्रेक खूप महत्वपूर्ण आहेत.

3- या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग सोबत सिंगल आणि ड्युअल क्लचचा पर्याय देखील देण्यात आला आहे. तसेच यामध्ये साईड शिफ्ट ट्रान्समिशन असून यामध्ये अंशिक स्थिर जाळी गिअर बॉक्स आहे. या ट्रॅक्टरमध्ये दोन रिव्हर्स गिअर्स असून आठ फॉरवर्ड गिअर्स आहेत.

4- या ट्रॅक्टरचा पुढील टायरचा आकार हा 6.0×16 इंच आणि मागील टायरचा आकार 13.6× 28 इंचाचा आहे. ट्रॅक्टरची लांबी 3475 एमएम आणि रुंदी १७०० एमएम असून उंची 2150mm आहे.

5- 1902 किलोग्रॅम वजनाचे हे ट्रॅक्टर असून हे 1650 किलो वजन किंवा शेतीचे अवजारे उचलू शकते. ट्रॅक्टरची इंधन टाकीचे क्षमता 57 लिटरची आहे

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

आयशर कंपनीने नुकतेच लॉन्च केलेल्या या 40 एचपी इंजिन क्षमतेच्या आणि चार व्हील ड्राईव्ह पर्याय असलेल्या आयशर  380 4WD प्रायमा G3 ट्रॅक्टरची किंमत ही सात लाख 90 हजार ते आठ लाख वीस हजार रुपयांच्या दरम्यान आहे.