Tur Crop Management : तुरीवर अळ्यांचे सावट! ही फवारणी करा, नाहीतर उत्पादन घटणार ; तज्ञांचा सल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Crop Management : तूर हे राज्यात उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. दरम्यान आता राज्यातील तूर उत्पादकांची चिंता वाढली आहे. तुर पिकावर वेगवेगळ्या अळ्यांचे सावट पाहायाला मिळत आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे.

अकोला जिल्ह्यात पाने पोखरणारी अळी तुर पिकावर सर्वाधिक पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळीच फवारणी करण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून दिला जात आहे. अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन या पिकानंतर तुरीच्या लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. या पिकावर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

अशा परिस्थितीत या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे यावर वेळेत उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे. खरं पाहता सोयाबीन, कापूस या पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. मात्र तुरीचे पीक मागल्या महिन्यापर्यंत जोमात होते.

मात्र चालू महिन्यात या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. ज्या तुरीच्या पिकात फळधारणा झाली आहे अशा पिकात शेंगा गळू लागल्या आहेत. तसेच जे तुरीचे पीक फुलं धारणेवर आहे अशा तुरीच्या फुलांची गळ होत आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे बसवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पक्षी पिकांवरील अळी व कीटकाला नष्ट करणार आहेत. याशिवाय शेतकरी बांधवांनी तुरीच्या झाडाला हलवून अळ्या खाली पाडून नष्ट केल्या पाहिजेत. जाणकार लोकांच्या मते ढगाळ हवामानामुळे तुर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव अधिक झाला आहे.

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी अळ्यांपासून पीक सुरक्षित ठेवण्यासाठी इमामेक्टीन बेजोएट 5 टक्के, 3 ग्रॅम किंवा लॅव्डा सायहेलोमेथ्रीन 5 टक्के द्रव्य 10 मिली किंवा ईथिऑन 50 टक्के 20-25 मिली अथवा क्लोरेनट्रेनीलिप्रोल 18.5 टक्के द्रव्य 2.5 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मात्र फवारणी करताना हँडग्लोव्हज आणि तोंडाला मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.