खरीप हंगाम पावसामुळे वाया गेला ; रब्बी हंगाम खतटंचाईमुळे जाणार ! युरिया टंचाईमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Urea Shortage : यावर्षी शेतकरी बांधवांना खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसला. खरिपात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं. हे दुःख कसं-बस पचवून आर्थिक नुकसान झालेले असताना देखील पैशांची उभारणी करत रब्बी हंगामातील पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

दरम्यान आता रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून वाया जाणार असल्याचे चित्र आहे. खरं पाहता खरीप हंगामात अमरावती विभागातील शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले होते. त्याच अमरावती विभागात आता युरिया टंचाई प्रकर्षाने जाणवू लागले आहे. विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे.

या परिस्थितीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी खतांची मात्रा देण्याचे काम शेतकरी करत आहेत. काही पिकांना प्रामुख्याने युरिया या खताची गरज असते. मात्र विभागात युरियाची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या महिन्याभरापासून विभागात युरिया उपलब्ध नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

यामुळे हंगाम सुरू होण्याआधी छातीठोकपणे खतांची कमतरता होणार नाही असं सांगणार सरकार आता कुठे गेलं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील जवस करडई गहू हरभरा ज्वारी मका यांसारख्या पिकांची पेरणी पूर्ण केली असून काही ठिकाणी पेरणीला एक ते दोन महिना उलटला आहे. अशा परिस्थितीत लागवड होऊन दोन महिने उलटलेल्या पिकांना खतांची मात्रा देणे अति आवश्यक आहे.

विशेषतः मका पिकाला युरिया लावणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची फरपट होत आहे. यामुळे पुन्हा एकदा शासनाचे नियोजन आणि उदासीन धोरण ऐरणीवर आल आहे. अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वासिम या तीन जिल्ह्यात प्रामुख्याने युरिया टंचाई असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच कृषी विभागाकडून शेतकरी बांधवांना नॅनो युरियाचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. खरं पाहता नॅनो युरिया हा द्रवरूपात उपलब्ध असतो. यामुळे जमिनीचा पोत खराब होत नाही. कमी खर्चात युरियाची गरज भागवली जाऊ शकते. विशेष म्हणजे नॅनो युरिया कमी प्रमाणात पिकाला दिला जातो यामुळे पिकाचा दर्जा सुधारतो. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही, जमिनीचा ऱ्हास होत नाही आणि उत्पादनात वाढ होते असा दावा केला जातो. म्हणजे नॅनो युरिया या युरिया टंचाईवर एक प्रभावी पर्याय राहणार आहे.