Poultry Farming: कोंबडीची ‘ही’ जात पाळा आणि अंडी व मांस उत्पादनातून लाखो कमवा! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
vanraaj kombdi

Poultry Farming:- सध्या पोल्ट्री फार्मिंग उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून ग्रामीण भागामध्ये देखील आता कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.कारण देशांतर्गत आणि विदेशी बाजारपेठेमध्ये देखील सध्या अंडी आणि चिकनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवता येणे या माध्यमातून शक्य झाले आहे.

तसेच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवता यावा याकरिता सरकारकडून देखील विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येत आहे.ज्याप्रमाणे ब्रॉयलर कोंबड्यांचे पालन केले जाते. अगदी त्याच पद्धतीने आता देशी कोंबड्यांच्या देखील अनेक जाती कोंबडी पालनासाठी खूप फायद्याच्या ठरताना दिसून येत आहेत.

अधिक अंडी व दर्जेदार पौष्टिक मांस उत्पादन मिळवता यावे याकरिता कोंबडीची क्रॉस ब्रिड तयार केली जात आहे व त्यामधूनच तयार करण्यात आलेली वनराजा जातीची कोंबडी ही फायद्याची असून ती पोल्ट्री संशोधन संचालनालय हैदराबादने विकसित केलेली आहे. वनराजा कोंबडीचे पालन हे शेतकरी आणि तरुणांकरिता एक उत्तम कमाईचे साधन बनू शकते.

 वनराजा कोंबडीची वैशिष्ट्ये

वनराजा कोंबडीची जात हैदराबादच्या पोल्ट्री संशोधन संचालनालयाने विकसित केली असून भारतातील स्थानिक जातींमध्ये अतिशय प्रसिद्ध अशी जात आहे. वनराजा जातीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते व ग्रामीण भागामध्ये ती सहजासहजी पाळता येते.

अंडी व मांस उत्पादनाच्या बाबतीत ही कोंबडी पाळणे खूप फायद्याचे असून या कोंबडीची अंडी पौष्टिक असल्याने ते चढ्या भावाने विकली जातात. त्यामुळे अंडी व मांस या दोन्ही माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा मिळतो.

वनराजा कोंबडीची जात पाच महिन्यांची झाल्यावर अंडी द्यायला लागते. तुम्ही 500 वनराजा कोंबड्यांचे व्यावसायिक दृष्टिकोनातून पालन केले तरी तुम्ही लाखो रुपये कमाई करू शकता.तसेच वनराजा कोंबडीच्या मांसामध्ये चरबी कमी असते व खायला ते चवदार व पौष्टिक असते.

कोंबडीची ही जात लढाऊ स्वभावाची असून मोकळ्या जागेत पाळण्यासाठी उत्तम आहे. वनराजा कोंबडीच्या जातीच्या पिल्लाचे वजन 30 ते 40 ग्रॅम असते व सहा आठवड्यामध्ये या जातीच्या कोंबडीचे वजन 700 ते साडेआठशे ग्रॅमपर्यंत वाढते. साधारणपणे पाच महिन्यांनी या जातीची कोंबडी अंडी घालायला लागते व एका वर्षामध्ये 100 ते 110 अंडी घालते.

 वनराजा कोंबडीचे पालन पोषण असे करावे

बाजारामध्ये या जातीच्या एक किलो कोंबडीची किंमत पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत आहे. ग्रामीण भागातील तरुण शेतकरी ज्यांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे ते वनराजा कोंबडीची जात पालनासाठी निवडू शकतात. अगदी खुल्या ठिकाणी देखील सहजपणे या जातीच्या कोंबडीचे पालन करता येते.

समजा या कोंबडीच्या जातीला जर चांगली सावली असलेले शेड आणि प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजुक्त आहार मुबलक मिळाला तर कुक्कुटपालनात ही भरपूर नफा देऊन जाते. तसेच वनराजा कोंबडीचे विविध संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करायचे असेल तर लसीकरण करणे आवश्यक आहे.

अंडी उत्पादनासाठी जर वनराजा कोंबडीचे संगोपन करायचे असेल तर मादी कोंबडींची संख्या जास्त ठेवणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आहार व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे.

तसेच वेगवेगळ्या ऋतूनुसार या कोंबड्यांना शेडमधील तापमानाची योग्य व्यवस्था करण्याची विशेष काळजी घ्यावी. म्हणजेच अगदी साध्या पद्धतीने तुम्ही वनराजा कोंबडीचे पालन करून लाखो रुपये कमवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe