नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! बाजारात उचित दर न मिळाल्यामुळे पट्ठ्याने चक्क आलिशान गाडीमधून सुरू केली भाजीपाला विक्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral News : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे पिकते तिथे विकत नाही. मात्र आता असं राहिलेलं नाही. बळीराजा पिकवू देखील शकतो आणि विकू देखील शकतो.

याचच एक उत्तम उदाहरण समोर आल आहे ते सांगली जिल्ह्यातील आटपाडीतुन. खरं पाहता सांगली जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी चर्चेत राहतात.

शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आत्मसात करून सांगली जिल्हा एक सधन शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अनेकदा येथील शेतकऱ्यांना शेतीमालाला बाजारात अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

मात्र आटपाडी तालुक्यातील झरे गावचे प्रयोगशील शेतकरी वामन पांडुरंग गोरड यांनी मालाला कवडीमोल दर मिळतो म्हणून आरडा ओरड करण्याऐवजी एक भन्नाट कल्पना शोधली. त्याच झालं असं या युवक शेतकऱ्याने बहु कष्टाने मेथी या भाजीपाला पिकाची लागवड केली होती. या भाजीपाला पिकाची हार्वेस्टिंग सुरू झाली असून बाजारात विक्रीसाठी शेतकऱ्याने प्रत्यक्षात सुरुवात केली आहे.

मात्र बाजारात झालेल्या लिलावात मेथीच्या भाजीला अतिशय कवडीमोल दर मिळाला. मग काय या शेतकऱ्याने हिम्मत न खचता आपल्या आलिशान कारमधून आटपाडी आठवडी बाजारात मेथीची भाजी विक्री केली आहे. मेथीची भाजी विक्री करण्यासाठी बळीराजा चक्क आलिशान कारमधून आठवडी बाजारात दाखल झाल्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये याविषयी मोठ्या चर्चा रंगल्या. शेतकरीच स्वतः उत्पादित केलेला माल विक्रीसाठी बाजारात आला असल्याने ग्राहकांचा देखील ओढा शेतकऱ्याकडे वळला.

परिणामी आलिशान कारमधून आलेल्या या बळीराजाची मेथीची भाजी चांगल्या दरात आणि लवकर विक्री झाली. बाजारात मेथीच्या भाजीला अतिशय नगण्य दर मिळत होता. शिवाय वाहतुकीचा खर्च देखील अधिक होतो. अशा परिस्थितीत या युवक शेतकऱ्याने बाजारात लिलावाला घेऊन जाण्याऐवजी मेथीची भाजी स्वतः आठवडी बाजारात विक्री करण्यास प्राधान्य दिले.

स्वतःचीच आलिशान कार असल्याने इतर वाहणाला पैसे देण्याऐवजी स्वतःच्याच कारमधून भाजीपाला विक्रीसाठी नेला. त्यामुळे या पठ्ठ्याची आठवडी बाजारात सर्वत्र चर्चा होती. एकंदरीत या अवलिया शेतकऱ्याने शेतकरी राजा पिकवू देखील शकतो आणि विकू देखील शकतो हे सिद्ध केलं आहे.