Wheat Crop Management : गहू पिकात असं करा पाणी व्यवस्थापन ; उत्पादनात होणार भरीव वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Wheat Crop Management : राज्यात रब्बी हंगामात गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाच्या हंगामात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यात वेळेवर गव्हाचीं पेरणी झालेली आहे आणि उशिरा गहू पेरणी देखील येत्या चार ते पाच दिवसात आटपली जाणार आहे.

अशा परिस्थितीत आता पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. दरम्यान आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी गहू पेरणी केल्यानंतर कशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन आणि अंतरमशागतीची कामे केली पाहिजेत, याविषयी थोडक्यात माहिती घेऊन हजर झालो आहोत.

जाणकार लोकांच्या मते गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. भारी जमिनीत पेरणी केलेल्या गव्हाला 18 दिवसाच्या अंतराने, मध्यम जमिनीत पेरणी केलेल्या गव्हाचा पंधरा दिवसाच्या अंतराने सात वेळा पाणी दिले पाहिजे.

तसेच पेरणी केलेल्या कवाला 10 ते 12 दिवसांनी 8 ते 10 वेळा पाणी द्यावे. गव्हाच्या पिकाला योग्य वेळी पाणी दिल्यास त्याच्या उत्पादनात भरीवं वाढ होते. अशा परिस्थितीत आज आपण गहू पेरणी केल्यानंतर किती दिवसांनी पाणी दिले पाहिजे हे देखील जाणून घेणार आहोत.

कृषी तज्ञ असं सांगतात की, मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी म्हणजे पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी पाणी दिले पाहिजे. या अवस्थेत गव्हाच्या पिकाला जर कमी पाणी भेटले तर उत्पादनात घट होते आणि गहू लवकरच पक्व होतो. यामुळे या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

तसेच फुटवे फुटण्याची अवस्थेत म्हणजे पेरणी नंतर ५५-६० दिवसांनी पिकाला पाणी दिल पाहिजे. अशावेळी जर पाण्याचा ताण पडला तर ओंब्या कमी लागतात. ओंब्याचीं लांबी कमी राहते. परिणामी गव्हाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती असते. त्यामुळे यावेळी देखील पाणी कमी पडणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. 

तसेच पीक फुलोऱ्यात असताना म्हणजे साधारणपणे पेरणी नंतर ७०-८०- दिवसांनी पाणी पिकाला देणे गरजेचे असते.

याशिवाय दाण्यात चिक भरण्याच्या अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी पिकाला पाणी लागत. या अवस्थेत जर पाणी कमी भेटलं तर दाणे कमी प्रमाणात पोहोचले जातात त्यामुळे साहजिकच उत्पादन घडते.

दाणे टणक होण्याची अवस्थामध्ये म्हणजे पेरणी नंतर ११० दिवसांनी सिंचन केलं पाहिजे. या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी राहतो. साहजिकच ही देखील अवस्था महत्त्वाचीं असते, म्हणून या अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.