Wheat Farming : गहू उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी ! भारतीय संशोधकांनी विकसित केल्या गव्हाच्या नवीन जाती ; वाचा सविस्तर

Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामात पेरल जाणार एक मुख्य पीक आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असून गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी संपूर्ण भारत वर्षात झाली आहे. या पिकाची शेती पंजाब, हरियाणा या राज्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. याशिवाय देशातील इतरही राज्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे.

आपल्या राज्यातही या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. तसेच गव्हाच्या दरात यंदा चांगली विक्रमी वाढ झाली असल्याने भविष्यात गहू लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रात देखील वाढण्याची शक्यता आहे. जाणकार लोक कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकांच्या सुधारित वाणाची पेरणी करण्याचा सल्ला देतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गहू उत्पादक शेतकरी बांधवांना देखील गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून त्यांना चांगले उत्पादन मिळेल आणि उत्पन्नात वाढ होईल. अशातच बिहार मधील कृषी विद्यापीठाने गव्हाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. या जाती विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, या गव्हाच्या जाती अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे साहजिकचं गहू उत्पादकांना चांगले उत्पादन मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या जातीच्या विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, बिहार राज्यातील पश्चिमी चंपारण या ठिकाणी असलेल्या कृषी विद्यापीठाने गव्हाच्या काही जाती विकसित केल्या आहेत.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, पीबीडब्ल्यू 187, 322, 252 आणि गव्हाचे राजेंद्र गोंड 3 हे वाण त्यांनी विकसित केले आहेत. तसेच संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार PBW 187 चे उत्पादन हेक्टरी 70 ते 75 क्विंटल आहे. यामध्ये लोह आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

तसेच राजेंद्र 3 या जातीतून हेक्टरी ५० ते ५५ क्विंटल उत्पादन मिळते. या जातीच्या गव्हात झिंकचे प्रमाण जास्त आहे. निश्चितच गव्हाच्या या जाती गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होणार आहेत.