Wheat Rate : यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल बनवणार! दर तेजीतच राहणार ; तज्ज्ञांचा अंदाज

Wheat Rate : गहू हे रब्बी हंगामात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. दरम्यान गहू उत्पादकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदा गव्हाच्या दरात तेजीचं राहणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. खरं पाहता गहू चार महिन्यांपूर्वी 2300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत होता.

मात्र आता गव्हाला 2900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू लागला आहे. यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान पाहायला मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी जोपर्यंत सरकार खुल्या बाजारात गहू उतरवत नाही तोपर्यंत दर कमी होणार नसल्याचे सांगितले आहे. म्हणून यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल बनवेल यात तीळ मात्र देखील शंका नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू झाले आणि गव्हाचा जागतिक बाजारातील पुरवठा कमी झाला. यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असं झालं, परिणामी दरात वाढ झाली. याच काळात भारतीय गहू बाजारात आला. विशेष म्हणजे गव्हाचा साठा देशांतर्गत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने निर्यात देखील मोठ्या प्रमाणात झाली. निर्यात वाढली अन गहू उत्पादनात गेल्या वर्षी अतिउष्णतेमुळे घट झाली.

साहजिकच देशांतर्गत खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर कायम राहिला. परिणामी शासनाच्या हमीभाव केंद्रावर गव्हाची विक्री झाली नाही. याचा परिणाम म्हणून आता सरकारकडे खूपच कमी बफर स्टॉक शिल्लक राहिला आहे. तसेच आता बाजारात गव्हाची आवक कमी झाली. गव्हाची आवक कमी, बफर स्टॉक मध्ये घट या कारणांमुळे दरातील तेजी कमी होत नसल्याचे चित्र आहे. 

मध्यंतरी वाढलेले गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाकडून गव्हाची निर्यात थांबवण्यात आली. एवढेच नाही तर गव्हापासून तयार झालेल्या उत्पादनाची देखील निर्यात थांबवली गेली. पण शेतकरी बांधवांनी आणि स्टॉकिस्ट लोकांनी दराचा वाढता आलेख पाहता विक्री थांबवली. यामुळे गव्हाचे दर वाढतच राहिले.

मात्र जेव्हा निर्यात बंदीचा निर्णय झाला त्यावेळी थोडीशे दर नरमले होते. पण आता गेल्या चार महिन्यापासून दरात सातत्याने वाढ होत असून 2900 रुपये प्रतिक्विंटल वर गव्हाचे दर येऊन ठेपले आहेत. गहू दरवाढ पाहता प्रक्रिया उद्योगाकडून सरकारकडे खुल्या बाजारात स्टॉक मधील गहू विक्री करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र शासनाकडे बफर स्टॉक मध्ये खूपच कमी प्रमाणात गहू शिल्लक असल्याने हे शक्य नसल्याचे चित्र असून शासनाने देखील खुल्या बाजारात गहू विक्रीचा निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान काही प्रक्रिया उद्योगातील जाणकार लोकांनी शासनाने जर खुल्या बाजारात गहू उतरवला नाही तर गव्हाला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळणार आहे. साहजिकच सध्याची परिस्थिती गहू उत्पादकांसाठी अनुकूल असून यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल बनवूनच सोडणार आहे.