कोण म्हणतं शेती परवडत नाही? पट्ठ्याने जिरेनियम शेती सुरू केली ; लाखोंची कमाई झाली

Aurangabad Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता पारंपारिक शेती पद्धतीला बगल दाखवत आहेत. बळीराजा आता काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत नवनवीन प्रयोग राबवत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विशेष म्हणजे या प्रयोगातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातही आता शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्याच्या गल्ले बोरगाव येथील एका शेतकऱ्याने देखील काहीतरी जरा हटके करायचं या अनुषंगाने जिरेनियम शेती सुरू केली आहे.

विशेष म्हणजे हा प्रयोग पंचक्रोशीत नवखा असला तरी देखील या पठ्ठ्याने या पिकाच्या शेतीतून लाखोंची कमाई करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. गणेश खोसरे असं या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून गेल्या तीन वर्षांपासून ते जिरेनियम शेती करत आहेत. गणेश यांनी सांगितल्याप्रमाणे, ते आधी पारंपारिक पद्धतीने शेती करत होते.

Advertisement

मात्र पारंपारिक पीक पद्धतीत उत्पादन खर्च वाढला आहे आणि उत्पन्न घटले आहे. यामुळे बाजारात नेहमी मागणी मध्ये असलेल्या पिकांची आपण शेती केली पाहिजे असा त्यांनी विचार केला. मग काय यासाठी त्यांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान एके दिवशी युट्युबवर व्हिडिओ पाहत असताना त्यांना जिरेनियम शेतीचा व्हिडिओ पाहायला मिळाला. तेथून त्यांना या शेतीबद्दल उत्सुकता वाढली.

मग काय त्यांनी या शेतीची सर्व एबीसीडी समजून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना अहमदनगर मध्ये एका शेतकऱ्याने जिरेनियम शेतीचा प्रयोग यशस्वी केला असल्याची माहिती समजली, म्हणून त्यांनी त्या शेतकऱ्याचा जिरेनियम प्लॉट पाहण्यासाठी अहमदनगर जवळ केले.

या भेटीदरम्यान त्यांनी जिरेनियम शेतीचे बारकावे समजून घेतले आणि घरी परतत जिरेनियम शेतीची लागवड सुरू केली. गणेश यांना जिरेनियम शेती करण्यासाठी ड्रीप आणि खते तसेच मजुरी म्हणून एकरी एक लाख रुपयांचा खर्च आला. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या पिकांना प्राण्यांपासून कोणताच धोका नाही, शिवाय या पिकांवर रोगराई तसेच कीटकांचा कोणताच प्रादुर्भाव होत असल्याने खर्च वाचतो.

Advertisement

गणेश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पहिल्या वर्षी एक लाख वीस हजार दुसऱ्या वर्षी एक लाख 60000 आणि आता यावर्षी त्यांना जिरेनियम शेतीतून दोन लाखांची कमाई होण्याची आशा आहे. अजून योग्य नियोजन आखल्यास उत्पादनाचा आकडा आणखी वाढू शकतो. गणेश यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मुंबईमधील एका कंपनीशी करार केला असून जिरेनियमच्या पानांपासून तेलाची निर्मिती करून त्यांना यातून आता शाश्वत उत्पन्न मिळत आहे.

विशेष म्हणजे गणेश यांना जिरेनियम पानांपासून तेल काढण्यासाठी डिस्टिलेशन प्लांट उभारायचा आहे. म्हणजेच इतर शेतकरी जे जिरेनियमची लागवड करतात त्यांना देखील याचा फायदा होणार आहे. निश्चितच एकीकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याच वाढतं प्रमाण लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे असेही अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे.

निश्चितच शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये असा भन्नाट प्रयोग केला तर त्यांना शाश्वत उत्पन्न मिळू शकते आणि शेतकरी आत्महत्येचा लागलेला महाराष्ट्राला कलंक पुसला जाऊ शकतो. यासाठी निश्चितच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हेतू शासनाला देखील काहीतरी उपाययोजना आखणे आणि वारी आहे. दरम्यान गणेश यांचा हा प्रयोग इतरांना निश्चितच प्रेरक ठरणार आहे. 

Advertisement