शेती व्यवसायात नवीन आहात का? तर या व्यवसायांच्या मदतीने सुरू करा शेती व्यवसाय, मिळेल पैसा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रत्येकच व्यवसायाचे असे असते की जेव्हा तुम्ही तो व्यवसाय सुरू करायचे ठरवतात त्या अगोदर तुम्हाला त्या व्यवसायाची तपशीलवार माहिती असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही व्यवसायामध्ये उतरणे फायद्याचे ठरते. कालांतराने तुम्ही व्यवसायात उतरल्यानंतर अनुभवाने शिकत जातात व बऱ्याच गोष्टी तुम्ही नंतर स्वतःहून करायला लागतात. परंतु तरीदेखील तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये येताना बऱ्याच गोष्टी शिकणे महत्त्वाचे असते.

आता शेती म्हटले म्हणजे शेतकरी कुटुंबातील मुलांना जास्त करून काही सांगण्याची गरज नाही. तरी देखील शेतीमध्ये स्वतः काही करायची वेळ आली तर तुम्ही परंपरागत शेती पद्धती सोडून नवीन पद्धतीने जर शेती करायचे ठरवले तर नक्कीच या माध्यमातून शेतीमध्ये नवीन येणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. याच अनुषंगाने आपण शेती व्यवसायात नवीन येणाऱ्या तरुणांना शेतीची सुरुवातच कोणत्या पिकांची लागवड किंवा कोणत्या व्यवसायाच्या माध्यमातून करावी? याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

 या व्यवसायांच्या मदतीने सुरू करा शेती

1- फ्लोरिकल्चर कोणताही ऋतू असला तरी फुलांची मागणी बाजारपेठेमध्ये नेहमीच असते. भारताचा विचार केला तर प्राचीन काळापासून फुलांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. परंतु आता यामध्ये अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आले असून त्यातून नफा देखील कमावणारे अनेक शेतकरी आहेत.

त्याकरिता तुमच्याकडे फक्त सुपीक जमीन असणे गरजेचे आहे. फुल शेतीमध्ये तुम्ही जरबेरा लागवड, गुलाबाची लागवड किंवा झेंडूच्या फुलांची लागवड करू शकतात. अगदी कमीत कमी गुंतवणुकीतून तुम्ही तुमचा शेती व्यवसाय सुरू करू शकतात व या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवू शकतात. फ्लोरिकल्चर म्हणजेच फुलशेतीमध्ये तुम्ही जर हंगामानुसार फुलांची लागवड केली तर खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळतो.

Ag Facts: Floriculture | Oklahoma Agriculture in the Classroom

2- बांबू लागवड अथवा बांबू फार्मिंग बांबू आपल्याला सगळ्यांना माहिती असून हे एक उपयुक्त वनस्पती असून यापासून अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. बऱ्याच प्रकारच्या वस्तू या बांबू पासून बनतात म्हणून याला मागणी देखील तेवढेच आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये इथेनॉल निर्मितीत बांबूला प्राधान्य देण्यात येणारा असून यापुढील काळ हा बांबू लागवडीसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.

दीर्घ कालावधीचे हे पीक असल्यामुळे नफा मिळाला किंवा पैसा यायला वेळ लागू शकतो परंतु नंतर तुम्ही या माध्यमातून खूप चांगला पैसा मिळवू शकतात. समजा तुम्ही बांबूचे एक झाड लावले तर तुम्हाला जवळपास पाच क्विंटल यापासून बांबूचे उत्पन्न मिळते. साधारणपणे तुम्ही 500 क्विंटल बांबूचे उत्पादन घेतले तरी तुम्ही दीड ते दोन लाख रुपये आरामात कमवू शकतात. तसेच याच्या व्यवस्थापनाकरिता तुम्हाला खर्च देखील जवळजवळ नगण्य लागतो.

Bamboo Farming Information Guide For Beginners | Agri Farming

3- एलोवेरा फार्मिंग किंवा कोरफड लागवड सध्या मोठ्या प्रमाणावर कोरफडीची मागणी वाढत असून शेतीमध्ये नवीन येणाऱ्या तरुणांकरिता कोरफड लागवड एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. फक्त याची मार्केटिंग आणि याच्या मध्ये महत्त्वाची माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. याकरिता देखील फार जास्त खर्च येत नाही. चार ते पाच वेळा सिंचनाची सुविधा असली तरी तुम्ही कोरफड लागवड यशस्वी करू शकतात.

तसेच याकरिता जास्त प्रमाणात कीटकनाशक आणि खतांची देखील आवश्यकता भासत नाही. कोरफडच्या माध्यमातून तुम्ही दोन प्रकारचा व्यवसाय करू शकतात. यातील पहिला म्हणजे तुम्ही कोरफडीचे प्रक्रिया युनिट उभारू शकता किंवा कोरफड लागवड करून त्याची विक्री करू शकतात.

Earn up to Rs. 10 Lakhs from Aloe Vera Farming: Complete Profit Analysis  Inside

4- बी फार्मिंग किंवा मधमाशी पालन मध अतिशय पौष्टिक पदार्थ असून त्याची मागणी बाजारपेठेमध्ये भरपूर असते. याकरिता मधमाशीपालन हा व्यवसाय अतिशय लोकप्रिय असून तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये मधमाशापालनाकरिता लागणाऱ्या पेट्या ठेवू शकतात.

जर तुम्ही 200 ते 300 बॉक्स मध्ये मधमाशांचे पालन केले तर तुम्हाला चार ते पाच हजार चौरस फूट जमीन लागते. परंतु हा व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला त्यासंबंधीची आवश्यक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर व्यवस्थित प्लॅनिंग बनवून तुम्ही मधमाशी पालन व्यवसाय सुरू करू शकतात व या माध्यमातून लाखो रुपये कमवू शकतात.

Top Honey Bee Farming Services in Delhi - हनी बी फार्मिंग सर्विसेज, दिल्ली  - Best Bee Farming Services - Justdial

5- खतांचा व्यवसाय शेती करत असताना तुम्ही शेतीत याल परंतु त्यासोबतच जर शेतीसाठी आवश्यक असणारी बी बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक विक्रीचा व्यवसाय केला तर तो खूप फायद्याचा ठरू शकतो. आज अनेक लोक खताचा व्यवसाय करून खूप चांगला प्रकारे पैसा कमवत आहेत.

खत विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला सरकारकडून काही आवश्यक परवाने घेणे गरजेचे असते. परवाना प्राप्त झाल्यानंतरच तुम्ही खताचे दुकान टाकू शकतात किंवा उघडू शकतात. या व्यवसायाचे सर्व नियोजन करून जर तुम्ही कामाला सुरुवात केली तर यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पैसा मिळतो. हा व्यवसाय सुरू करण्याकरिता  एक पुरेशी जागा आणि दोन लाख रुपये भांडवल राहिले तरी तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता.

తక్కువ పెట్టుబడితో ఎరువుల వ్యాపారం... ఎంత లాభదాయకమంటే... | Start Fertilizer  Business With Low Investment Details, Fertilizers, Fertilizers Business,  Crops, Farmers, Agriculture Department, Rural Ares ...