7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नशीब उलगडणार ! डीए ३८ टक्क्यांहून अधिक होणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Goverment) सतत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Staff) महत्वाचे निर्णय घेत असते. गेल्या काही दिवसांमध्येच महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्यात आली होती. तसेच आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा (Pensioner) महागाई भत्ता आणि महागाई सवलत पुन्हा एकदा ४ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ने मार्चसाठी जारी केलेल्या आकडेवारीत 1 पॉइंटची वाढ नोंदवली आहे, अशा स्थितीत महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढेल असा विश्वास आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात, DR मध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए आणि डीआर 34 वरून 38 टक्क्यांपर्यंत वाढेल.

खरं तर, सातव्या वेतन आयोगांतर्गत, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीमध्ये दुप्पट सुधारणा करण्यात आली आहे.

पहिला जानेवारी महिन्यात आणि दुसरा जुलैमध्ये दिला जातो. 30 मार्च रोजी सरकारने डीए आणि डीआरमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर ते 31 वरून 34 टक्क्यांपर्यंत वाढले.

जुलैमध्ये डीए आणि डीआरमध्ये सुधारणा झाल्यास त्यात पुन्हा 4 टक्क्यांची वाढ होऊ शकते. दोन महिन्यांच्या सततच्या घसरणीनंतर, मार्च 2022 मध्ये 1 पॉइंटचा चढता क्रम दिसून आला आहे.

त्यामुळेच डीए वाढण्याची आशा जागृत झाली आहे. मात्र, एप्रिल, मे आणि जूनचे आकडे येणे बाकी असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये थोडीशी घसरण झाली. जानेवारीमध्ये डेटा 125.1 वर आला होता, जो फेब्रुवारीमध्ये 125 वर आला होता. आता मार्चमध्ये ती वाढून 126 झाली आहे.

येत्या काही महिन्यांत त्यात आणखी वाढ झाल्यास डीए वाढण्याची खात्री आहे. अहवालानुसार, जुलैमध्ये डीएमध्ये पुन्हा 4 टक्के वाढ होऊ शकते. याचा फायदा 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

जुलै 2021 मध्ये केंद्राने महागाई भत्ता आणि महागाई सवलत 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवली. कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने जवळपास दीड वर्षांपासून डीए बंद केला होता.

ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा डीए 3 टक्क्यांच्या आणखी वाढीसह 31 टक्क्यांवर पोहोचला. आता तो 3 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला आहे.