चाळीस वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेत केली आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीने गळफास घेऊन एका चाळीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव या गावामध्ये घडली आहे.

अनिल माधवराव गायकवाड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कृष्णा सोन्याबापु गायकवाड (वय 19 रा. जिरेवाडी ,निपाणी वडगाव ,ता.श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

त्यावरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल गायकवाड यांनी कोणत्या कारणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली

याची माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार हे पुढील तपास करीत आहेत.