नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासकीय अधिकारी ‘ऑन ग्राउंड’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने कठोर नियमांची अमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिक बेजाबदारपणे गर्दी करताच आहे.

यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये वाढ होत आहे. कोपरगाव शहरात महसूल, पोलीस आणि कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी- विक्री केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच रस्त्यावर उतरले होते.

यामध्ये तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

दरम्यान कोरोनाचा धोका वाढल्याने जिल्हा प्रशासनाने सर्वाना नियमांच्या अधीन राहूनच आपली कामे व जबाबदाऱ्या पार पडायला सांगितली आहे. मात्र नागरिकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे.

यामुळे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरत शहरात ठिकठिकाणी संयुक्तपणे भेटी दिल्या आहेत.

तसेच नियमांचे उल्लंघन करणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे.

तसेच नियमितपणे मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|