अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- जिल्हा परिषदेतील दोन्ही लिफ्ट गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत होत्या. याबाबत अनेकदा ओरड निर्माण झाली होती. कोठेतरी या प्रश्नाला गंभीर घेत प्रशासनाला जाग आली असून अखेर या दोन्ही लिफ्ट सुरू झाल्या आहे.

दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेतील दोन्ही लिफ्ट नादुरूस्त झाल्याने बंद होत्या. पुढे करोनाच्या स्थितीमुळे शासनाकडून दुरूस्तीसाठी निधी मिळत नव्हता. दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये शासनाने यासाठी निधी मंजूर करून दोन्ही नवीन लिफ्टसाठी परवानगी दिली.

दोन्ही लिफ्टसाठी 46 लाखांची तरतूद करण्यात आली होती. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या लिफ्टचे काम सुरू होते. अखेर सोमवारी ही लिफ्ट सर्वांसाठी खुली झाली. जिल्हा परिषद येथे सोमवारी पदाधिकारी-अधिकार्‍यांच्या हस्ते लिफ्टचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख,

समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कार्यकारी अभियंता रविंद्र परदेशी, चौधर आदी उपस्थित होते.