अहमदनगर ब्रेकिंग : आण्णा हजारांचे ते वादग्रस्त वक्तव्य…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-शाळा-महाविद्यालये आणखी काही महिने बंद ठेवा, त्याने काही फरक पडत नाही. नाहीतरी शिक्षक तिथे जाऊन कोणता उजेड पाडतात? अशा प्रकारचे अवमानकारक वक्तव्य अण्णा हजारे यांनी केल्याचे एका वृत्तपत्रात छापून आले असून सर्व शिक्षकांचा अपमान केला आहे.

त्यांच्या या माहिती शून्य वक्तव्याचा अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून जाहीर निषेध करत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. नवनाथ टकले व प्रा. सतीश शिर्के यांनी दिली आहे.

राज्यातील मंदिरे उघडी करण्याबाबत मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी रविवारी अण्णांची भेट घेतली असता त्यांनी कोणतीही माहिती न घेता हे वक्तव्य केले आहे. आजही अनेक शिक्षक लसीकरणापासून वंचित आहेत.

वास्तविक पाहता कोरोना मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी अध्यापनाची कामकाज चालू ठेवले आहे ऑनलाईन अध्यापनाची कुठलेही प्रशिक्षण सोयीसुविधा उपलब्ध नसतानासुद्धा शिक्षकांनी ते कौशल्य आत्मसात करून ऑनलाईन अध्यापन केले आहे.

याशिवाय अनेक शिक्षकांना कोविड काळात शासकीय सेवेत कर्तव्य बजावले आहे त्यात अनेक त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच आजही अनेक शिक्षक वाड्या वस्त्यावर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन कार्य करत आहे. याशिवाय अनेक शाळाबाह्य कामे या काळातही शिक्षकांना लावली आहेत.

याची कुठलीही माहिती अण्णांनी घेतली नाही. अण्णा सारख्या जबाबदार माणसांच्या वक्तव्याचे पडसाद समाजात खोलवर जात असतात त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी माहिती घेणे अपेक्षित होते. मंदिरे उघडणे अथवा न उघडणे याबाबत शासन व टास्क फोर्स निर्णय घेईल

त्याचा शिक्षकांच्या कामकाजशी कुठलाही संबंध नसताना त्याची तुलना करणे योग्य असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे. शिक्षकांनी काम केले नसते तर दहावी-बारावीचे निकाल कसे लागले असा सवालही संघटनेने अण्णा हजारे यांना केला आहे. अण्णा हजारे यांच्या वक्तव्याचा निषेध आज विविध समाज माध्यमातून शिक्षकांनी केला आहे.