अहमदनगर ब्रेकिंग : खेळाडू मृत्यु प्रकरणी ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरात विजेचा शॉक लागून ३० वर्षीय अजिंक्य गायकवाड याचा मृत्यू झाला.या प्रकरणी टि.व्ही. केबल मालक, महावितरणचे वायरमन, ज्यु. इंजिनिअर, केबल पुरवठादार, टिव्ही केबल पुरवठादार अशा ६ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, सुरेश गायकवाड (रा. साईनगर बुरुडगांव रोड, नगर) हे त्यांची पत्नी विजया, मुलगा अजिक्य व सुन असे हॉलमध्ये गप्पा मारत व टि.व्ही. पाहत बसलो असताना हॉलचे उत्तरेकडील खिडकीतून बाहेर पडत असणा-या पावसासोबत चुरचुर आवाज येत असल्याने अजिंक्य यास आवाज कशाचा येत आहे याबाबत पाहण्यास सांगितल्याने अजिंक्य हा टि.व्ही.च्या विद्युत जोड असणारे बोर्डजवळ लावलेल्या वायरला प्लग व्यवस्थित लावलेला आहे की नाही हे पाहण्यास गेला असता त्याचा खिडकीचे ग्रॅनाईटला उजवा हात लागल्याने त्यास इलेक्ट्रीक शॉक बसल्याने तो गोल गिरकी घेवून खाली पडला असताना त्याचे उजवे हाताचे बाजुने आगीच्या ठिणग्या पडत होत्या तसेच सदर ठिकाणावरून धूर निघत असल्याचे दिसले.

त्याची आई विजया ही जोरात किंचाळली. त्या वेळी घरातील सर्वजण हॉलमध्ये काय झाले हे पाहण्यास आले. त्यावेळी अजिंक्य यास इलेट्रीक शॉक बसल्याचे समजल्याने अभिजीत यास फोन करून सदरची घटना सांगितली. त्यावेळी अजिंक्य यास शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न केले परंतु तो शुध्दीवर आला नाही

त्यावेळी अभिजीत व त्याचे मित्रांनी त्यास आनंदऋषी हॉस्पीटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी अजिंक्य हा मयत झाल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे दाखल नोंद झाली. सिव्हील हॉस्पीटल येथील डॉक्टरांनी अजिंक्य यास मृत्यू हा इलेक्ट्रीक शॉक लागून झाल्याचे सांगितले.

त्यानंतर अकस्मात मृत्यूचे चौकशी कामी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक दाणी यांनी घराचा पंचनामा करुन चौकशी केली. तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी येवून घराची पाहणी केली. पाहणीत बाहेरील बाजुने टिव्ही केबल बांधलेली होती. तसेच सदरची केबलची पाहणी केली असता केबल घराचे पश्चिमेस अंदाजे ७० ते १०० फुट अंतरावरुन आलेली होती.

टि.व्ही. केबल असलेल्या ठिकाणी ११ के.व्ही. लाईटचे तारांचे वरुन आलेली दिसली. त्यावेळी असे निदर्शनास आले की, सदरची टि.व्ही. केबल ही ११ के.व्ही तारांचे वरुन आल्याने टि.व्ही. केबल तारांना घासुन त्यामधून इलेक्ट्रीक सप्लाय पास होवून अजिंक्य यास इलेक्ट्रीक शॉक बसलेला आहे.

पोलीसांनी महावितरण यांचे कार्यालयाशी संपर्क साधुन त्याबाबत तपास केला असता महावितरण कार्यालय यांनी त्यांचेकडील पत्राप्रमाणे अपघाताचा निष्कर्ष प्राप्त झाला असून त्यामध्ये त्यांनी लेखी दिले आहे. दिनांक २८/८/२०२१ रोजी महावितरण कंपनीच्या उच्चदाब ११ के.व्ही.मार्केट यार्ड उपरीतारामार्गामध्ये महावितरण कंपनीकडुन एक नवीन विद्युत खांब रोवण्यात आला होता.

सदर विद्युत खांब ज्या ठिकाणी रोवण्यात आला होता त्या ठिकाणी विजवाहके खांबावरुन खाली उतरविण्यात आली होती. व खांब उभारणीचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा उपरीतार विजवाहके पुन्हा खांबावर चढविण्यात आली होती. पुन्हा चढविण्यात आलेल्या तारांना स्पर्श करुनच मेन लोकल टि.व्ही. नेटवर्कची इनकमर केबल ही अंजिक्य सुरेश गायकवाड हे राहत असलेल्या घरावर चढविण्यात आली होती.

महावितरण कंपनीचे विजवाहके पुन्हा वीज खांबावर चढवत असताना लोकल टि.व्ही. नेटवर्कची इनकमर केबलचे घर्षण महावितरण कंपनीच्या वीज वाहंकासोबत झाल्याने लोकल टि.व्ही. नेटवर्कच्या इनकमर केबलचे बाहेरील इन्सुलेशन आवरण निकामी होवुन आतील वाहकामध्ये विद्युत प्रवर्तन होवुन, लोकल टि.व्ही. नेटवर्कच्या केबलमध्ये लिकेटच करंट आल्याने सदर अपघात घडल्याचे चौकशी वरुन निष्कर्षीत होते.

तसेच घटनास्थळी गच्चीवर पाण्याच्या टाकीवर असलेले केबल कनेक्टर (स्प्लिटर) व त्यास जोडलेली टि.व्ही. केबलच्या विजप्रवाहमुळे जळाल्याचे निदर्शनास आले व या विजप्रवाहामुळे जळालेल्या इनकमर केबल अज्ञात व्यक्तीने कापुन घेवून गेल्याचे पाहणी दरम्यान निदर्शनास येते असा अभिप्राय दिलेला आहे.

त्यामुळे महावितरण कंपनी यांनी दिनांक २८/८/२०२१ रोजी सदर ठिकाणी काम करत असताना सदर खांबावरील विजवाहक उपारीतारा या खाली घेवून व पुन्हा वर चढविताना सदर ठिकाणी असणारी टि.व्ही. केबल घासून त्यावरील इन्सुलेशन आवरण निकामी झाल्यानेच सदर टि.व्ही. केबलमध्ये इलेक्ट्रीक प्रवाह आलेला आहे.

तसेच टिव्ही केबल ही श्रीगणेश केबल सव्हींसचे मालक वनीता अनिल बोरा हे असून हे कामकाज हे त्यांचा मुलगा पियुष अनिल बोरा (रा. विनायकनगर) यांनी विनापरवाना टि.व्ही. केबल ही विदयुत तारेच्या वरुन टाकल्यामुळेच अजिंक्य सुरेश गायकवाड हा टिव्ही केबलमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाला चिटकुन मयत झालेला आहे.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुरेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वनीता अनिल बोरा, पियुष अनिल बोरा (दोघे रा. विनायकनगर अ.नगर) महावितरण कंपनीचे सदर ठिकाणी खांबावरील विजवाहक उपारीतारावर चढविणारे संबंधित कर्मचारी, महावितरण कंपनीचे या ठिकाणी असणारे ज्यूनियर इंजिनियर, पियुष बोरा यांना केबल कनेक्शन पुरविणारे अहमदनगर, जिल्हयाचे पुरवठादार, टि.व्ही. केबल पुरवठादार कंपनी. या ६ जणांविरुध्द मृत्यूस कारणीभूत असल्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.