अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यापारी बेपत्ता ! इनोव्हा कारसह…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking :- अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात भागात राहणारे व चारचाकी वाहनांचा खरेदी – विक्री व्यवसाय करणारे व्यापारी अनुप रूपचंद लोढा ,वय ४३ वर्ष हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत.

याबाबत त्यांची पत्नी रूपाली अनुप लोढा यांनी काल श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार क्रमांक 23/2022 प्रमाणे तक्रार नोंदवली आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की,अनुप लोढा हे घरात कोणाला काहीही न सांगता इनोवा कार घेऊन तीन दिवसापूर्वी बेपत्ता झाले आहे.

याबाबत या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस हवालदार लाला पटेल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,पोलिस निरीक्षक श्री. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप लोढा यांचा कसून शोध सुरू आहे.

Ahmednagar Breaking : Famous traders in the district go missing!