अहमदनगर ब्रेकिंग : पाचशे रुपये देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- अहमदनगरमधील कर्जत येथील एका आरोपीने अल्पवयीन शेळ्या चरावयास घेऊन जाणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अधिक माहिती अशी पीडितेच्या आईने कर्जत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, अल्पवयीन मुलगी ही शेळ्या चारण्यासाठी गेली असता पाचशे रुपये देऊन पीडितेला त्याचे घरात घेऊन तिच्यावर अत्याचार केला.

तिला काही पैसे दिले. घडलेली घटना तुझ्या आईबापाला सांगितली तर तुला जीवे ठार मारून टाकेल अशी धमकी दिली होती. काल पुन्हा असा प्रकार करण्याचा आरोपी प्रयत्न करत असताना पीडित मुलीच्या बहिणीने हा प्रकार पाहिला.

तिने आई वडिलांना हा प्रकार कळविला. तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, ईश्वर माने, संतोष फुंदे, गोरख जाधव, जयश्री गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले.

आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याला अटक केली. आरोपी मोहन जोशी निंबाळकर (रा. पाटेवाडी) याला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.