Breaking news. World news with map backgorund. Breaking news TV concept. Vector stock.

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव (ता.नगर) येथे झालेल्या खुनाचे रहस्य उलगडण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. केडगाव-अरणगाव बायपास रोडवरील रेल्वे ब्रीजजवळ वाहन चालकाचा खून करणार्‍या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

मिनीनाथ मच्छिंद्र अडसरे (रा. कायनेटिक चौक, नगर, हल्ली रा. अरणगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या दोघांच्यात वाद झाल्याने मिनीनाथने विकासला मारहाण केली.

या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. विकास कदम हा काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्यात आली. त्यामध्ये ता. 25 ऑगस्ट रोजी विकासचे एका सहकाऱ्यासमवेत मोबाईलवरून वाद झाले होते. विकासने मोबाईल चार्जिंगला लावला होता. तो कोणीतरी लपवून ठेवला होता.

विकास आणि त्याचा सहकारी चालक व मित्र मिनीनाथ मच्छिंद्र अडसुरे (रा. कायनेटिक चौक, सध्या रा. अरणगाव, ता. नगर) हे दोघे ता. 25 रोजी रात्री एकत्र दारू पिण्यासाठी गेले होते.

त्या ठिकाणी मोबाईल लपविल्यावरून दोघांमध्ये वाद झाले. मिनीनाथ याने या वादातून विकासला काठीने मारहाण केली. विकासचा या मारहाणीत मृत्यू झाला.असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

दरम्यान आरोपी मिनीनाथ मच्छिंद्र अडसरे (रा. कायनेटिक चौक, नगर, हल्ली रा. अरणगाव ता. नगर) याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.