अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द शिवारातील साकूर मळा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाची चिमुरडी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.

साकुर मळा येथील वाकचौरे कुटुंबीय आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी शिवांगी संतोष वाकचौरे ही तीन वर्षांची मुलगी एकटी खेळत असतान जवळच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला.

यावेळी शिवानीच्या आई वडिलांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन वर्षीय शिवानीला आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांनी तातडीने संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

बिबट्याच्या हल्ल्यात अत्यवस्थ झालेल्या तीन वर्षीय बालिकेला तिच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांनी तातडीने खाजगी वाहनातून संगमनेर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच शिवानीचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.