file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- निराधार वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यासाठी ६५ वर्षांच्या वृद्धेची हत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील आंभोळ गावात शुक्रवारी घडली. वृद्धेच्या शवविच्छेदन अहवालानुसार हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी अकोले व राजूर पोलिसांनी संशयित म्हणून दोन जणांना ताब्यात घेतले. मृत वृद्धेचे नाव कांताबाई तुकाराम जगधने (रा. आंभोळ) असे आहे. कांताबाई जगधने यांचे आंभोळ शिवारात घर असून तेथे त्या एकट्याच राहत होत्या. एका व्यक्तीस घरावरची कौले बसवून देण्याचे काम त्यांनी दिले.

त्याने ते घर शेकारले. मात्र, त्याची नजर वृद्धेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यावर पडली. ताब्यात घेतलेले संशयित वृद्धेच्या घरापासून काही अंतरावर रहात आहेत. त्यांनी सायंकाळी कोतूळ गावात मद्यपान केले. त्यानंतर वृद्धेच्या घरी जावून त्यांना पाणी मागून सोबत घेऊन आलेले दारू प्याले.

गळ्यातील दागिन्यावर गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी वृद्धेची हत्या केली. गळ्यातील दागिने दोघेही निघून गेले. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक राहुल मदने, सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे,

नरेंद्र साबळे यांनी भेट देऊन पहाणी केली. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार वृद्धेची हत्या झाल्याचे सामोर आले. कांताबाई यांना सावत्र मुले आहेत. पण ते मुंबईत कामाला आहेत.