Ahmednagar City News : थकबाकीदारांनी लोकअदालतमध्ये भाग घ्यावा : महापौर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- नगर शहरात आतापर्यंत सुमारे २१ कोटींची वसुली झाली आहे, तसेच २५ सप्टेंबरला आयोजित लोक अदालतीत नागरिकांनी सहभाग घ्यावा, त्यात त्यांना सवलत दिली जाईल, अशी माहिती महापाैर रोहिणी शेंडगे यांनी दिली.

मनपा हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुली संदर्भात महापौर रोहिणी शेंडगे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे,

सचिन शिंदे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, श्रीनिवास कुऱ्हे, सहाय्यक आयुक‍त संतोष लांडगे, सचिन राऊत, दिनेश सिनारे, राजेश लयचेट्टी, राजू नराल आदी उपस्थित होते.

शेंडगे म्हणाल्या, सद्यस्थितीत वसुली कमी प्रमाणात होत आहे, असे निदर्शनास आले आहे. वसुली लिपीक प्रभागात फिरून मालमत्ताधारकांना घरपट्टी भरण्याबाबत प्रोत्साहित केल्यास मालमत्ताधारक घरपट्टी भरतील.

आॅगस्टअखेर सुमारे २१ कोटी रुपयांची वसुली झाली अाहे. पुढील काळात जास्तीत जास्त घरपट्टी वसुली बाबत कार्यवाही करावी.

मागील महिन्यात लोक अदालतीच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या, त्याप्रमाणे २५ सप्टेंबरला लोक अदालत घेण्यात येणार आहे. त्यात थकबाकीदारांना ७५ टक्के शास्ती माफी मिळेल. यासाठी नागरिकांनी लोक अदालतमध्ये भाग घेण्यासाठी संबंधित प्रभाग अधिकारी यांचेशी संपर्क साधून अर्ज सादर करावे, असे आवाहन महापौर शेंडगे यांनी केले.