अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ८०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९९ हजार ४६३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ९९८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९५ आणि अँटीजेन चाचणीत ३११ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अकोले ०७, जामखेड १९, कर्जत ०१, नगर ग्रा. १२, नेवासा ०१, पारनेर ३३, पाथर्डी २२, राहता ०२, राहुरी ०२, संगमनेर ०४, श्रीगोंदा ३९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०८ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, अकोले १०, जामखेड ०४, कर्जत १९, कोपरगाव १३, नगर ग्रा.३७, नेवासा २५, पारनेर १०, पाथर्डी ०३, राहता ३२, राहुरी २८, संगमनेर १००, शेवगाव ५२, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३११ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले ३९, जामखेड १५, कर्जत ३१, कोपरगाव ०२, नगर ग्रा. १८, नेवासा २१, पारनेर २८, पाथर्डी ०६, राहता १७, राहुरी १२, संगमनेर ४३, शेवगाव ३५, श्रीगोंदा ३७, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २१, अकोले ६४, जामखेड ५८, कर्जत ३७, कोपरगाव ०७, नगर ग्रा. ४२, नेवासा ६५, पारनेर १०६, पाथर्डी ४१, राहता ४३, राहुरी ३१, संगमनेर ११४, शेवगाव ६३, श्रीगोंदा ७२, श्रीरामपूर २६, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,९९,४६३
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:५९९८
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:६३७१
  • एकूण रूग्ण संख्या:३,११,८३२