file photo

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०२ हजार ४४० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०९ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ८९९ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८३ आणि अँटीजेन चाचणीत २९४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले ०१, जामखेड ०४, कर्जत ०२, नगर ग्रा. ०६, नेवासा ०१, पारनेर १४, पाथर्डी २१, राहुरी ०१, संगमनेर १२, श्रीगोंदा ८५, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, अकोले १७, कर्जत ०९, कोपरगाव ०७, नगर ग्रा.१५, नेवासा १६, पारनेर १३, पाथर्डी ०४, राहता १४, राहुरी २०, संगमनेर १६५, शेवगाव ३२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २९४ जण बाधित आढळुन आले. अकोले ३२, जामखेड ०७, कर्जत १८, कोपरगाव १५, नगर ग्रा. २४, नेवासा ११, पारनेर ६७, पाथर्डी ०४, राहता १५, राहुरी १२, संगमनेर ५०, शेवगाव ०८, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर ०५ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, अकोले ६७, जामखेड ५४, कर्जत ५७, कोपरगाव २६, नगर ग्रा. ५८, नेवासा २१, पारनेर ८२, पाथर्डी ५४, राहता ४०, राहुरी ४९, संगमनेर १२३, शेवगाव ५५, श्रीगोंदा ८१, श्रीरामपूर ३४ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,०२,४४०

उपचार सुरू असलेले रूग्ण:५८९९

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६४२०

एकूण रूग्ण संख्या:३,१४,७५९