अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०६ हजार ६८८ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ७५२ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४६ आणि अँटीजेन चाचणीत ३४३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले १७, जामखेड ०२, कर्जत ०४, नगर ग्रामीण ०२, पारनेर १९, पाथर्डी ०३, संगमनेर ६६, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०६ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले १८, कर्जत ०५, कोपरगाव ०५, नगर ग्रा.१३, नेवासा १९, पारनेर ०८, पाथर्डी ०२, राहाता ३२, राहुरी ०६, संगमनेर १११, शेवगाव ०४, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३४३ जण बाधित आढळुन आले. मनपा ०८, अकोले ६७, जामखेड ०८, कर्जत ३६, कोपरगाव ०२, नगर ग्रा. ०६, नेवासा १६, पारनेर ४६, पाथर्डी ०४, राहाता ११, राहुरी १०, संगमनेर ५८, शेवगाव ०२, श्रीगोंदा ५७, श्रीरामपुर ०३ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ५०, जामखेड ०५, कर्जत ४९, कोपरगाव २१, नगर ग्रा. ४४, नेवासा १५, पारनेर ३५, पाथर्डी ३७, राहाता ३६, राहुरी २४, संगमनेर १२२, शेवगाव ६३, श्रीगोंदा २०, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,०६,६८८

उपचार सुरू असलेले रूग्ण:४७५२

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६४६९

एकूण रूग्ण संख्या:३,१७,९०९