file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- कोरोना नियंत्रणासाठी उपाय योजनांमध्ये लसीकरण हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. लसीकरणाबाबत नगरकर जागृत आहेत. आतापर्यंत तब्बल १ लाख ७३ हजार नागरिकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला, तर ६२ हजार ७१७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असला तरी लसीकरण केंद्राबाहेरची गर्दी अद्याप ओसरलेली नाही. नगर शहराची लोकसंख्या सुमारे साडेचार लाख असून जिल्ह्यात सर्वाधिक उद्रेक नगर शहरातच झाला.

मागील वर्षी कोरोना रूग्णवाढीचा वेग कमी होता, परंतु जानेवारीनंतर पुन्हा रूग्णसंख्या झपाट्याने वाढून दुसऱ्या लाटेचे राैद्ररूप नगरकरांनी पाहिले. आता रूग्णसंख्या नियंत्रणात आली आहे.

दररोज सरासरी ३० ते ४० रूग्ण नगर शहरात वाढत आहेत. त्यातुलनेत ग्रामीण भागातील काही तालुक्यांत रूग्णवाढ सुरूच आहे. महानगर पालिकेचे दक्षता पथक आता जागृती करण्याच्या भूमिकेत आहे.

शहरात आतापर्यंत सुमारे ५७ हजार ७६० जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ५६ हजार ६२३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर मृत्युचा आकडाही हजारी पार गेला.

शहरात आतापर्यंत, १ लाख ७३ हजार नागरिकांनी कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. तसेच ६२ हजार ७१७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरण करताना आता प्रशासनाकडून दुसरा डोसचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.