Ahmednagar crime news चालकाच्या खूनप्रकरणी एकास अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- केडगाव अरणगाव बायपास रोड वरील रेल्वे ब्रीजजवळ झालेल्या चालकाच्या खून प्रकरणातील एकास पकडण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे.

मिनीनाथ मच्छिंद्र अडसरे (चालक, मुळ रा.कायनेटीक चौक अहमदनगर सध्या रा. अरणगाव ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्याचे नावे आहेत.आरोपी अडसरे याला दि.२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,

नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप यांच्या सुचनेनुसार नगर तालुका पोलीस ठाण्याचे सफौ. पठाण, पोहेकॉ रमेश गांगर्डे, रावसाहेब खेडकर, पोना भानुदास सोनवणे, धर्मराज दहिफळे,

रवि सोनटक्के पोकॉ ज्ञानेश्वर खिळे, प्रशांत राठोड, जयदत्त बांगर, चालक सफौ घोरपडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २५ ऑगस्टला सकाळी ९ वा.चे. सुमारास केडगाव अरणगाव बायपास रोड वरील रेल्वे ब्रीजजवळ एक अज्ञात इसमाचे प्रेत मिळून आले होते.

सदर मयताचे शवविच्छेदन केले असता त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने टणक हत्याराने पाठीत मारलेमुळे व फुप्फुसास सुज आलेने तो मयत झाला. या घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७५/२०२१ भादवि. क. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागिय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप हे करीत होते.

या घटनेतील मयताची ओळख पटविणे कामी सर्व जिल्ह्यामधे तसेच नजीकच्या जिल्ह्यामधे संदेश देण्यात आलेला होता. तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांच्या सहाय्याने सदर मयत व्यक्तीची ओळख पटवली गेली. सदर मयताचे नाव विकास महादेव कदम (वय 40 वर्षे सध्या रा. वैष्णवी नगर केडगाव अहमदनगर) असे आहे.

गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे खून करणारा आरोपी हा त्याचे मयत सोबत ड्रायव्हींगचे काम करणारा मिनीनाथ मच्छींद्र अडसरे हा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तात्काळ त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता, आरोपी अडसरे याला दि.2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.