Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी !

Ahmednagar News :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश पोटे याच्या सह काही सहकाऱ्यांसमवेत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी आनंद शाळा गुलमोहर रोड अहमदनगर शहर या ठिकाणी गेले असतां.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्याचवेळी पोटे यांना समोरील विरोधी पक्षाचे भाजपा उमेदवार हे मतदारांना खाजगी ट्रॅव्हल द्वारे निवडणूक आचारसंहितेचे सर्व नियम पायदळी तुडवत सदरच्या खाजगी ट्रॅव्हल्स मधून आलेल्या मतदारांना घेऊन 100 मीटर एरियाच्या आत नेताना दिसले.

त्यावेळी पोटे यांनी व इतर कार्यकर्त्यांसह सदर खाजगी बस ट्रॅव्हलला विरोध करत संविधानिक रित्या सदर गाडीच्या समोर मांडी घालून बसले. त्याचाच राग मनात धरून पोटे याना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी बोलावून घेत तू जर पुन्हा असं काही केलं तर मी तुला पाहून घेईन आणि निवडणूक ही आज संपणार त्यानंतर तू जिथे असणार तेथे मी तुझे हातपाय काढून टाकणार असं बोलून धमकीचा इशारा दिला.

सदर घटनेचा तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला असून तरी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मागील अपराधिक इतिहास पाहता पोटे व त्यांच्या कुटुंबीयांला आज नंतर कुठल्याही प्रकारची हानी किंवा जीवितहानी झाल्यास त्यासाठी जबाबदार माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व यांचे कुटुंबीय जबाबदार रहाणार असल्याचे अर्जात म्हटले आहे.