Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा राज्यपालांना पाठिंबा ! म्हणाल्या, मी राज्यपालांना वैयक्तिकरित्या ओळखते…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amruta Fadnavis : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत. सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यपालांवर टीका होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपालांना पाठिंबा दर्शवल्याचे दिसत आहे.

राज्यपालांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला राज्यपालांच्या वक्तव्यावरून घेरण्यात येत आहे. अमृता फडणवीसांच्या वक्तव्याने शिंदे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अमृता फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, मी राज्यपालांना वैयक्तिकरित्या ओळखते, असे म्हणत त्यांनी राज्यपालांना पाठिंबा असल्याचे दर्शवले आहे. महाराष्ट्रात आल्यावर ते मराठी शिकले आहेत. त्यांना मराठीवर मनापासून प्रेम आहे.

मी स्वतः ही गोष्ट अनुभवली आहे, पण बरेचदा असे घडले आहे की त्यांनी काहीतरी वेगळे सांगितले आणि त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे. असेही घडले आहे की त्यांना काहीतरी वेगळे सांगायचे होते आणि त्याचा अर्थ वेगळा निघाला. ते मनाने मराठी माणूस आहेत. असेही फडणवीस म्हणाल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमृता फडणवीस यांनी कोश्यारींचा बचाव केल्याने राज्य सरकारची अडचण झाली आहे.

विरोधी पक्ष केंद्र सरकारकडे कोश्यारी यांना परत बोलावण्याची मागणी करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तर हे पार्सल अॅमेझॉनवरून महाराष्ट्रात पाठवण्यात आल्याचे सांगितले. यासोबतच कोश्यारी न हटवल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.