तारकपूरच्या बिशप हाऊसला महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांची भेट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  नाशिक धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. शरद गायकवाड नाशिक धर्म प्रांतांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करून अध्यात्मिक व सामाजिक दृष्ट्या धर्मप्रांत बळकट करण्यासाठी कष्ट घेत आहेत.

त्याद्वारे त्यांनी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी केले. शहरातील तारकपूर येथील बिशप हाऊस मध्ये भोसले यांनी भेट देऊन धर्म प्रांतात हाती घेतलेल्या कार्याविषयी संवाद साधताना ते बोलत होते.

महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने नाशिक धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. शरद गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. बिशप गायकवाड यांनी परिषदेच्या सर्व पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. सेंट सेव्हिअर्स चर्चचे सचिव प्रशांत पगारे यांनी सर्वांचा परिचय करून दिला.

बिशप गायकवाड यांनी नाशिक धर्म प्रांतातील ग्रामीण भागात दुर्लक्षित झालेल्या चर्चची पुनर्बांधणी करण्याकरिता विकासात्मक दृष्ट्या पुढाकार घेतला आहे. धर्मप्रांतातील अगदी ग्रामीण भागातील चर्च आणि मंडळी यांच्या उन्नत अवस्थेसाठी प्रयत्न करीत आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देऊन धर्म प्रांतासाठी बहुमूल्य योगदान देण्यात येणार आहे.

या प्रयत्नांमुळे धर्म प्रांतामध्ये येणार्‍या काळात ख्रिस्ती समाजासाठी मोठा बदल घडून येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या कार्याचे कौतुक करून धर्मप्रांताच्या माध्यमातून परिषदेला सर्वतोपरी सहकार्य राहील असेही सांगितले.

नाशिक धर्मप्रांतासाठीच्या या कार्यात महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद सोबत राहील अशी ग्वाही परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले व राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल असुर्लेकर यांनी दिली.

याप्रसंगी परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष डेरील डिसोझा, अहमदनगर जिल्हा सरचिटणीस प्रकाश लोखंडे, नगर शहराध्यक्ष अमोल लोंढे, उपाध्यक्ष ब्रदर सुनील वाघमारे, श्रीधर भोसले, फेलिक्स महंकाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!