Apple : वापरकर्त्यांना ॲपलने दिला मोठा धक्का, खिशावर येणार आर्थिक भार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apple : या नवीन वर्षात सर्वसामान्यांना अधिक धक्के बसत आहेत. अगोदर कार्सच्या किमतीत वाढ झाली तर आता ॲपलने आपल्या ग्राहकांना खूप मोठा धक्का दिला आहे.

भारतात ॲपलचे वापरकर्ते खूप आहेत. या नवीन वर्षात आयफोनची बॅटरी बदलणे महागात पडणार आहे. कंपनीने बॅटरीची किंमत पूर्वीपेक्षा खूप वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर आता आर्थिक ताण येणार आहे.

वॉरंटीमध्ये येत नाही बॅटरी

कंपनी आयफोनची बॅटरी वॉरंटी अंतर्गत कव्हर करत नाही, जरी AppleCare+ सदस्यांना विनामूल्य बॅटरी बदली मिळते. परंतु, आता फेब्रुवारीनंतर, मार्चपासून, ग्राहकांना आयफोनची बॅटरी बदलण्यासाठी अतिरिक्त $ 20 म्हणजेच सुमारे 2,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. नवीन बॅटरी बदलण्याची योजना 1 मार्चपासून सुरू होणार आहे.

सध्या iPhone 13, iPhone 12, iPhone 11 आणि iPhone X ची बॅटरी बदलण्यासाठी $69 म्हणजेच सुमारे 6,000 रुपये खर्च करावे लागत आहेत. परंतु 1 मार्चपासून त्याची किंमत $89 म्हणजेच सुमारे 7,385 रुपये होणार आहे. iPhone SE, iPhone 8 आणि इतर जुन्या मॉडेल्ससाठी बॅटरीची किंमत $49 म्हणजेच सुमारे 4,000 रुपये आहे. आयफोन 14 सीरीजची बॅटरी बदलण्याची सुविधा सध्या $99 मध्ये म्हणजेच सुमारे 8,000 रुपये इतकी आहे.

नवीन फोन Apple A17 चिप सह येणार 

नवीन वर्षात आयफोन 15 सीरीज लॉन्च होणार असून ती A17 Bionic चिपसेटसह सादर केली जाणार आहे. हा चिपसेट A16 बायोनिक चिपसेटपेक्षा 35 टक्के वेगवान असणार आहे. फक्त iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max A16 सह लॉन्च केले गेले आहेत. इतर दोन मॉडेल्स A15 सोबत सादर केले आहेत.

बॅटरीची क्षमता mAh मध्ये सांगत नाही

Apple त्यांच्या कोणत्याही उत्पादनांच्या बॅटरीबद्दल अधिकृतपणे तांत्रिक माहिती देत ​​नसून काही बेंचमार्क रिपोर्ट्सनुसार, iPhone 14 मध्ये 3279mAh, iPhone 14 Plus मध्ये 4325mAh बॅटरी आहे आणि iPhone 14 Pro मध्ये 3200mAh आणि iPhone 14 Pro Max मध्ये 4323mAh बॅटरी आहे.