अर्जेंटिनाने पटकावला कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  ब्राझीलला १-० अशा फरकानं पराभूत करत अर्जेंटिनाने तब्बल 28 वर्षांनंतर फुटबॉल स्पर्धेतील महत्त्वाचा जाणारा कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यापूर्वी १९९३ मध्ये अर्जेंटीनाने हा किताब आपल्या नावे केला होता.

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामना अर्जेंटिना व ब्राझील यांच्यात झाला. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. या विजयासह अर्जेंटिनानं १५ वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

कोपा अमेरिकन स्पर्धेत दोन पारंपरिक संघात लढत रंगदार लढत बघायला मिळाली. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत दाखल झाल्यानं संपूर्ण फुटबॉल जगताचं लक्ष या सामन्याकडं होतं.

सामन्यातील पहिल्या २० मिनिटांत दोन्ही संघात चांगलीच झुंज बघायला मिळाली. दोन्हीकडून तोडीस शतोड प्रतिकार केला जात असल्यानं कुणालाही गोलपोस्टपर्यंत पोहोचताच आले नाही.

पण, २२ व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.