अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- मुंबईतील खार पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सुरेश धामणे यांनी कोव्हीड महामारी विरोधातील लढाईत केलेल्या उल्लेखनीय योगदान, उत्कृष्ठ समर्पण आणि केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

लोणी गावचे सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सुरेश धामणे यांनी सन २०२० व २०२१ मध्ये कोव्हिड १९ महामारी विरोधातील लढाईत केलेल्या उल्लेखनीय योगदान, उत्कृष्ठ समर्पण आणि केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल त्यांचा नुकताच मुंबई बांद्रा पश्चिम येथील आर.डी. नॅशनल कॉलेज यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रपट अभिनेता व निर्माता तुषार कपुर तसेच चित्रपट अभिनेता दिलीप ताहिल यांचे हस्ते त्‍यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

निलेश सुरेश धामणे हे मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर खार पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत. तसेच ते पोलीस दलातील सेवेसोबत क्रिडा, पर्यावरण तसेच विविध समाजसेवेच्या उपक्रमांत सहभागी होवुन आपले विशेष योगदान देत आहेत.

ते तालुक्यातील लोणी बुद्रूक गावचे रहिवासी असुन ते निवृत्त प्राथमिक शिक्षिका श्रीमती कुसुम कवडे यांचे सुपुत्र आहेत. धामणे हे प्राथमिक शाळा, रयत शिक्षण संस्थेचे पद्मश्री विखे पाटील हायस्कुल व पद्मश्री विखे पाटील ज्युनियर कॉलेज, लोणीचे माजी विद्यार्थी आहेत

त्यांनी केलेल्या कार्यकतृत्वातुन लोणी गावचे नाव उज्ज्वल केले असून नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे या कार्यक्रमास भामला फाउंडेशनचे संस्थापक तसेच प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ता असिफ भामला, आर.डी. नॅशनल कॉलेज, बांद्रा प चे संचालक किशु मनसुखानी, प्राचार्य,श्रीमती नेहा जगतियानी आदि मान्यवर उपस्थित होते.