अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राहत्या घरात गळफास घेऊन एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर मधील ताजणे मळा परिसरात घडली.

डॉ. पुनम योगेश निघुते (वय 35) असे मयत डॉक्टरचे नाव असून त्या संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील चिरायू हॉस्पिटल मध्ये कार्यरत होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहरातील ताजणे मळा परिसरात डॉक्टर पुनम निघुते राहत होत्या. पती-पत्नी दोघेही डॉक्टर असून ते चिरायू नावाचे हॉस्पिटल चालवतात.

सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास डॉ. पुनम यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दत्तात्रय गुलाबराव जोंधळे यांनी शहर पोलिसांना या घटनेची खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री. शेख करत आहे. डॉक्टर पुनम निघुते यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.