Ather Energy : ग्राहक सध्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्कुटर सोडून इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच कंपन्या एकापेक्षा एक अशा शानदार इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात लाँच करू लागल्या आहेत. अशातच आता एथर आपली आगामी इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करण्याच्या तयारीत आहे.
अनेक दिवसांपासून कंपनी Ather 450S वर काम करत होती. अखेर ही स्कुटर मार्केटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. कंपनीकडून Ather 450S मध्ये 100 किमी रेंज दिली जाणार आहे. जी लाँच झाल्यानंतर Ola इलेक्ट्रिक स्कुटरला कडवी टक्कर देईल.
अशी आहेत फीचर्स
कंपनीच्या आगामी स्कूटरमध्ये तुम्हाला सर्वोत्तम फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यात 7-इंचाचा कलर टीएफटी स्क्रीन देण्याची शक्यता आहे. दरम्यान हे लक्षात घ्या की Honda Activa च्या तुलनेत Ather सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती खूप आहेत. Activa ची एक्स-शोरूम किंमत 75,347 रुपये असून तुम्हाला ही स्कूटर कमी किंमतीत लॉन्च करता येईल.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार केला तर कंपनीकडून अजूनही या स्कूटरच्या किमती जाहीर करण्यात आल्या नाहीत. मात्र असे मानले जात आहे की कंपनी 75,000 रुपयांपर्यंतच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात लॉन्च करेल. त्यामुळे जर तुम्हाला एक उत्तम स्कूटर घ्यायची असल्यास कंपनीची ही आगामी स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
तसेच कंपनीशी निगडित असणारी बँक तुम्हाला ही स्कूटर खरेदी करण्यासाठी जबरदस्त फायनान्स योजना देईल. यात तुम्हाला सुमारे 100 किमीची रेंज देण्यात येईल. यात जबरदस्त सेफ्टी फीचर्स देण्यात येतील.