अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्वाती गोरक्ष दुतारे हिला प्राप्त झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी दिली.

ही योजना इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक मिळवून यश मिळवणाऱ्या अनुसूचित जाती विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाते.

कु. दुतारे स्वाती ही सर्वसाधारण विद्यार्थी मध्ये एन. टी.सी वर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल रुपये ५००० चा धनादेश देण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या हस्ते या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी उपप्राचार्य नासिर सय्यद, उपप्राचार्य प्रा. रामदास बर्वे, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.सतीश शिर्के, अजिनाथ ससाणे, पालक हभप दुतारे महाराज आदी उपस्थित होते.

या यशाबद्दल तिचे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, सदस्य स्नेहल ताई शिंदे, माजी आमदार अशोकराव काळे यांनी अभिनंदन केले.