Bank Holiday 2022: ग्राहकांनो बँकेचे काम आताच निपटून टाका ; सप्टेंबरमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Holiday 2022: ऑगस्ट (August) महिना संपत आला आहे, बँकेशी (bank) संबंधित काही काम असेल तर ते ताबडतोब निपटून काढा, कारण सप्टेंबरमध्ये (September) 13 दिवस बँक बंद राहतील (Bank Holidays in September 2022).

ऑनलाइन व्यवहार सेवा Google Pay, Phone Pay, Paytm, इंटरनेट बँकिंग (Online Transfer) सेवा सुरू राहिल्या असल्या तरी, सप्टेंबरमध्ये सतत बँक बंद राहिल्यामुळे चेकबुक, पासबुक, एटीएम आणि खाते आणि व्यवहार यांसारख्या बँकिंग संबंधित कामांवर परिणाम होऊ शकतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीत सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नाहीत.

bankholiday1-1606726032-1608962836-1200x900

या सुट्ट्यांमध्ये गणेश चतुर्थी, ओणम, नवरात्री स्थानपना यांसारख्या सणांचा समावेश होतो. याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यांचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ अकाउंट्स या बँक सुट्ट्यांच्या यादीमध्ये तीन श्रेणींचा समावेश केला आहे.

सप्टेंबर बँक हॉलिडे 2022 (Bank Holidays in September 2022)

1 सप्टेंबर 2022 गणेश चतुर्थी, 4 सप्टेंबर 2022 रविवार (साप्ताहिक सुट्टी), 6 सप्टेंबर 2022 कर्म पूजा – रांचीमध्ये बँका बंद, 7 सप्टेंबर 2022 पहिला ओणम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद, 8 सप्टेंबर 2022 तिरुओनम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद.

1264714-bank-closed-ians

9 सप्टेंबर 2022 इंद्रजात्रा – गंगटोकमध्ये बँक बंद, 10 सप्टेंबर 2022 शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), 11 सप्टेंबर 2022 रविवार (साप्ताहिक सुट्टी), 18 सप्टेंबर 2022 रविवार (साप्ताहिक सुट्टी), 21 सप्टेंबर 2022 श्री नारायण गुरु समाधी दिन – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद.

Bank-Holiday-News

24 सप्टेंबर 2022 शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार), 25 सप्टेंबर 2022 रविवार (साप्ताहिक सुट्टी), 26 सप्टेंबर 2022 नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही का मेरा चौरे होवा – इंफाळ आणि जयपूरमधील बँका बंद राहतील.