ATM मधून पैसे काढताना सावधानता बाळगा… अन्यथा होईल फसवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- आता एटीएम हे पैसे काढण्याचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. रोख पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याचा ट्रेंड बराच कमी झालाय.

आता प्रत्येक जण ATM मधूनच पैसे काढत आहे. मात्र या डिजिटल युगात फसवणुकीचे प्रकार देखील दिवसेंदिवस अपडेट होत आहे. अशा परिस्थितीत सर्व फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एटीएम कार्डचे क्लोनिंग करून पैसे चोरूनही फसवणूक केली जातेय.

अशा पद्धतीतीने तुम्ही तुमची फसवणूक होण्यापासून वाचू शकता

1. एटीएम मशीनमधून पैसे काढताना कार्डधारकाने मशीनमध्ये कार्ड घालण्याचे स्थान नेहमी तपासावे. ठगांनी त्या ठिकाणी क्लोनिंग यंत्र ठेवले आणि त्या व्यक्तीचे एटीएम कार्ड स्कॅन केले.

2. कार्डधारकाने त्याचा पिन नंबर टाकण्यापूर्वी कीपॅड देखील तपासावा.

3. कार्डधारकाने आपली बोटं कॅमेऱ्याच्या नजरेपासून दूर ठेवावीत किंवा आपला पिन टाकताना कीपॅड दुसऱ्या हाताने झाकून ठेवावा.

4. कार्डधारकाने चुंबकीय कार्डच्या जागी ईएमव्ही चिप आधारित कार्ड वापरावे. यासह जर कार्ड स्कॅन किंवा क्लोन केले असेल, तर फसवणूक करणाऱ्याला एन्क्रिप्टेड माहिती मिळेल, कारण ईएमव्ही कार्डमध्ये मायक्रोचिप असतात.

5. कार्डधारकाने दुकान, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये कार्ड स्वाईप करण्यापूर्वी POS मशीन तपासावे. मशीन कोणत्या बँकेची आहे ते तपासा. पीओएस मशीनची कंपनीदेखील मशीनचे बिल पाहून निश्चित करता येते. या व्यतिरिक्त स्वाईप क्षेत्र आणि कीपॅड देखील तपासा.

6. कार्डधारकाने शक्य तितके फक्त सार्वजनिक ठिकाणी किंवा एटीएम जेथे गार्ड आहेत, तेथेच एटीएमचा वापर करावा.

7. खरेदी, रिचार्ज किंवा इतर वॉलेटसाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सेव्ह करू नका.

8. जर पीओसी मशीन शॉपिंग मॉलमध्ये ओटीपीशिवाय व्यवहार करत असेल तर बँकेत जा आणि सुरक्षित कार्ड जारी करा, जे केवळ ओटीपीद्वारे व्यवहार पूर्ण करेल.

9. आपल्या कार्डमध्ये पैसे काढण्याची मर्यादा निश्चित ठेवा, जेणेकरून क्लोनिंग किंवा फसवणूक झाल्यास मर्यादित रक्कमच काढता येईल.

फसवणूक झाली तर हे करा :- जर बँक किंवा मशीनच्या बाजूने व्यवहार यशस्वी झाला आणि तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर तुम्ही ताबडतोब बँकेला कॉल करावा. काही तांत्रिक बिघाड झाल्यास बँकेतून 24 ते 48 तासांत पैसे खात्यात परत जमा होतात.