भंडारदरा धरण यंदा लवकर ओव्हरफ्लो होणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :-  गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे अल्पवधीतच धरणे, तलाव, बंधारे हे ओव्हरफ्लो झाले होते.

यातच यंदाच्या वर्षी पर्जन्यमान चांगले असणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामुळे यंदाच्या वर्षीही भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात गत दोन दिवसांपासून पुन्हा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

काल मंगळवारी दुपारी झालेल्या पावसाची नोंद भंडारदरात 7 मिमी झाली आहे.पाणलोटातील घाटघर, पांजरे, रतनवाडी भागातही पाऊस सुरू होता.

यंदा मान्सूनपूर्व पावसाने या भागात जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या शेती कामांनी वेग घेतला आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात सध्या निम्मा पाणीसाठा आहे.

काल मंगळवारी या धरणात 5567 दलघफू (50.43 टक्के) पाणीसाठा होता. जूनच्या सुरूवातीला हे धरण तसे रिकामे असते. पण यंदा हे धरण अर्धे भरलेले आहे.

त्यात पाऊस उत्तम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाल्यास हे धरण लवकर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.