Ration Card News : मोदी सरकारचा मोठा निर्णय ! रेशनवरील गहू आता…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card News : देशातील गरीब आणि कमकुवत उत्पन्न गटाच्या मदतीसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत आहे. त्यापैकी एक योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, ज्या अंतर्गत देशातील गरीब लोकांना तांदूळ, गहू, रेशनची मदत मोफत दिली जाते. या योजनेचा लाभ शिधापत्रिकाधारकांना दिला जातो.

PMGKAY योजनेंतर्गत उपलब्ध गहू आणि तांदळाच्या कोट्यात केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. सरकारने गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढवला आहे.

काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. या बदलानंतर या राज्यांतील लोकांना पूर्वीपेक्षा कमी गहू आणि जास्त तांदूळ मिळणार आहे.

केंद्र सरकारने PMGKAY योजनेअंतर्गत उपलब्ध गहू आणि तांदूळ कोट्यात मोठा बदल केला आहे. सरकारने गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढवला आहे.

रास्तधान्य दुकानात आता गहू कमी मिळणार आहे. सर्वसामान्यांना आधार असलेल्या रेशनवरील गहू कमी झाला आहे. रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. खुल्या बाजारात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धाचा भारतातही परिणाम दिसून येत आहे.

बाजारातून गहू खरेदी करणे न परवडणार्‍या व्यक्तींसाठी रेशनचा पर्याय लाभदायक ठरतो. परंतु आता पुरवठा विभागाने रेशनवरील गहू (wheat) कमी करुन त्याऐवजी तांदूळ ( rice) देण्याचा निर्णय घेतला आहे.

गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे. रेशन दुकानात प्रती कुटुंब 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिला जात होता. मात्र आता 1 किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.

परंतु राज्याच्या पुरवठा विभागाकडून त्याबाबत अधिकृत सांगण्यात आलेले नाही. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

प्राधान्य कुटुंबांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जात होते. त्याऐवजी आता एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती हाती आली आहे.

या मुळे निर्णय घेतला
या वेळी गव्हाची खरेदी अत्यंत कमी असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, हे विशेष. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी सुमारे 55 लाख मेट्रिक टन तांदूळ लोकांमध्ये जास्त वितरित केले जाणार आहेत.