मोदींची अहमदनगरमधील सभा ! पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अभिवादन..असे म्हणत सुरवात, विखेंना केलेले मतदान मोदींना मजबूत करेल असे म्हणत शेवट,आरक्षणावरही भाष्य, पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Modi In Ahmednagar : आज (दि.७ मे) अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली.

यावेळी सभेतील भाषणाची सुरवात त्यांनी ‘श्रद्धा व सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही कोटी कोटी अभिवादन करतो’ असे मराठीत उद्गार काढत केली.

काँग्रेसवर टीका
यावेळी भाषणातून मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. यंदा होत असलेली निवडणूक ही संतुष्टीकरण आणि तृष्टीकरण यांच्या दरम्यान होत असून एनडीए मेहनतीच्या माध्यमातून संतुष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतेय तर इंडिया आघाडीचे नेते तृष्टीकरण करतायेत असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा असून जोरदार प्रहार चढवला. त्यांनी यावेळी भाजपच्या व एनडीएतील घटक पक्षातील जाहीरनाम्यामधील मुद्यांचा पुनरुच्चार केला. विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान हे सर्व एनडीएच्या जाहीरनाम्यातील मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे या मुद्द्यावर काँग्रेस बोलत नाही. याउलट काँग्रेसने गरिबांसोबत विश्वासघात केला असून 50 वर्ष गरिबी हटवण्याचे खोटे आश्वासन केवळ काँग्रेसने दिले असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

आरक्षणावरून काँग्रेस लक्ष्य
यावेळी मोदी यांनी आरक्षणावरून काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याला विरोध केला होता त्या जाती आधारीत आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करतेय असा घणाघात केला.

काँग्रेसकडून दहशतवादी बेकसूर असल्याचे सर्टिफिकेट
‘मुंबईत २६-११ चा दहशतवादी हल्ला कोणी केला, आपल्या जवानांना कोणी शहीद केले याबाबत जनतेला सत्य माहित आहे. पाकिस्तानने देखील याबाबत कबुली दिली आहे. परंतु आता काँग्रेस पक्ष हेच दहशतवादी बेकसूर असल्याचे सर्टिफिकेट देत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

मुंबई हल्ल्याबाबत काँग्रेसच्या नेत्याने केलेलं वक्तव्य खतरनाक असून आहे. कसाबची बाजू घेणार आहे. देशाला कुठल्या बाजुला काँग्रेस घेऊन जात आहे हे तुम्हीच आता पहा असा घणाघाती आरोपही केला.

लोखंडे , विखेंना केलेले मतदान मोदींना मजबूत करेल
यावेळी मोदी यांनी खा. सुजय विखे व खा. सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्याचे आवाहन शेवटी केले. या दोघांना केलेले मतदान हे मोदींच्या खात्यात जमा होईल. केंद्रात मोदींना मजबूत करण्याचे काम करेल असे सांगितले.