अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- पदावर राहून जर मला माझ्या ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देता येत नसेल तर पदावर राहण्याचा उपयोग काय? अशी खंत व्यक्त करत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. 

त्यानंतर आज अखेर तायवाडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. 

तशी माहिती तायवाडे यांनी नागपुरात दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनं नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्याने राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय.

कोण आहेत बबनराव तायवडे?

  • ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
  • त्यांनी धनवटे नेशनल कॉलेज मध्ये प्राचार्य म्हणून काम बघितलं
  • काँग्रेस च्या तिकिटावर 2013 मशे त्यांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवली
  • तायवाडे कॉलेज नावाने त्यांचं कॉलेज आहे
  • काँग्रेस नेते , आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे
  • नागपूर विद्यापीठ सिनेट मेम्बर म्हणून काम पाहिलं