सर्वात मोठी बातमी : राज्यात ‘या’ तारखेपासून कॉलेज सुरु ….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णसंख्या कमी होत आल्याने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालं की प्रत्यक्ष कॉलेज सुर करण्याचा विचार सुरु आहे

अशी माहिती माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यासंदर्भात कुलगुरु आणि जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर कॉलेज सुरु करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

राज्यात पारंपारिक विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणारी सर्व वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूची बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीमध्ये प्रत्येक विद्यापीठाच्या कक्षेत येणार्‍या कार्यक्षेत्राचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याचा विचार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आलं आहे.

वसतीगृह आणि कॉलेजची व्यवस्था पाहून येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनची स्थिती काय आहे

यावर हा निर्णय घेतला जाईल. याबाबतचा अहवाल आमच्याकडे 15 दिवसांत येईल त्यानंतर यासंबंधीची माहिती दिली जाईल’ असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे.