विज बिलांच्‍या कारणाने शेतक-यांचे विज कनेक्‍शन तोडू नये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- भारतीय जनता पक्षाच्‍या किसान मोर्चाच्‍या वतीने शेतक-यांच्‍या विविध मागण्‍यांचे निवेदन देण्‍यात आले. तालुक्‍यातील पाचही मंडळातील शेतक-यांना पीक विमा योजनेचा

लाभ मिळावा म्‍हणून नव्‍या तरतुदी लागू कराव्‍यात, विज बिलांच्‍या कारणाने शेतक-यांचे विज कनेक्‍शन तोडू नये, दूधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे अशा मागण्‍या सरकारकडे करण्‍यात आल्‍या आहेत.

किसान मोर्चाचे तालुका अध्‍यक्ष बाळासाहेब डांगे यांच्‍या नेतृत्‍वाखाली शेतक-यांच्‍या विविध मागण्‍यांचे निवेदन तहसिलदार आणि तालुका कृषि आधिकारी यांना देण्‍यात आले. याप्रसंगी डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे संचालक स्‍वप्‍नील निबे, किसान मोर्चाचे उपाध्‍यक्ष दत्‍तात्रय डांगे, नामदेव घोरपडे, प्रविण चौधरी, पप्‍पू पगारे आदि उपस्थित होते.

पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिल्‍याने राहाता तालुक्‍यातील पाच मंडळामध्‍ये फळपीक विम्‍याच्‍या परताव्‍याच्‍या नवीन अटींनुसार डांळींब व पेरु उत्‍पादक शेतकरी पात्र ठरावेत यासाठी पहिल्‍या ट्र‍िगरमध्‍ये पाचही मंडळाचा समावेश व्‍हावा,

आघाडी सरकारने शेतक-यांना मार्च २०२० मध्‍ये कर्जमाफी जाहीर केली परंतू नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना कोणताही लाभ सरकार देवू शकलेले नाही.

५० हजारांपेक्षा कमी कर्ज असलेल्‍या शेतक-यांनाही कर्जमाफी करावी, पीक विम्‍याचा लाभ शेतक-यांना मिळावा, दूधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे विज बिलाच्‍या रक्‍कमेसाठी कनेक्‍शन रद्द करु नयेत आशा मागण्‍या किसान मोर्चाच्‍या निवेदनात करण्‍यात आल्‍या आहेत.